नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम

उत्तुंग फटकेबाजीसह वैभव सूर्यवंशीनं प्रस्थापित केला नवा विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:38 IST2025-12-12T16:38:28+5:302025-12-12T16:38:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Vaibhav Suryavanshi Smashes Six Hitting World Record India vs UAE Under 19 Asia Cup Match | नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम

नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम

Vaibhav Suryavanshi Breaks World Record With Most Sixes : ICC च्या दुबई येथील मैदानात १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेच्या युएई विरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारताचा युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीनं ऐतिहासिक खेळी साकारली. भारताच्या डावाची सुरुवात करताना पहिल्या पाच चेंडूचा सामना अगदी जपून केल्यावर तो UAE च्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला. द्विशतक अगदी टप्प्यात असताना तो विकेटमागे चतुराईनं चेंडू टोलवण्याच्या नादात बोल्ड झाला. पण त्याआधी त्याने ९५ चेंडूतील १७१ धावांच्या खेळीच्या जोरावर अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याची ही खेळी ९ चौकार आणि १४ षटकारांनी बहरेलेली होती. या खेळीतील षटकारांच्या जोरावर १४ वर्षीय पोरानं १७ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

उत्तुंग फटकेबाजीसह वैभव सूर्यवंशीनं प्रस्थापित केला नवा विश्वविक्रम

१९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आता वैभव सूर्यवंशीच्या नावे झाला आहे. याआधी युवा एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या मायकेल हिल (Michael Hill) याच्या नावे होता. २००८ मध्ये नामिबीया विरुद्धच्या सामन्यात त्याने १२ षटकार मारले होते. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं १४ षटकारांसह १७ वर्षांपूर्वीचा हा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

वैभव सूर्यवंशीचं द्विशतक हुकलं! पण १४ वर्षांच्या पठ्ठ्यानं धवन-गिलला मागे टाकत साधला विक्रमी डाव

द्विशतकासह मोठा डाव साधण्याचीही क्षमता

१९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात दुसरे शतक झळकावताना १७१ धावांच्या खेळीसह  त्याने भारताकडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली. अंबाती रायडू याने १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात १७७ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे. वैभव सूर्यवंशीचा प्रत्येक स्पर्धेतील विक्रमाचा धडाका पाहता हाच विक्रम नव्हे तर यंदाच्या हंगामात द्विशतकासह तो नवा विश्ववक्रमही प्रस्थापित करेल, असे संकेत मिळत आहेत. यूथ वनडेत सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या जॉरिच व्हॅन शाल्कविक याच्या नावे आहे. यावर्षी हरारेच्या मैदानात झिम्बाब्वेविरुद्ध या पठ्ठ्यानं २१५ धावांची खेळी साकरली होती.

१९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्यातही तो नंबर वन

२०२४ ते २५ या कालावधीत वैभव सूर्यवंशी याने १२ सामन्यातील १२ डावात २ शतकासह ७२७ धावा करताना ५७ षटकार मारले आहेत. या यादीत उत्मुक्त चंद दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २१ सामन्यातील २१ डावात ११४९ धावा करताना ४३ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. यशस्वी जैस्वालनं २०१८ ते २०२० या कालावधीत २७ सामन्यातील २७ डावात १३८६ धावा करताना ३८ षटकार मारले आहेत. कमी वयात १९ वर्षांखालील संघात खेळत असल्यामुळे तो षटकारांचे शतक सहज साध्य करू शकतो. 

Web Title : वैभव सूर्यवंशी: 14 वर्षीय ने छक्कों से विश्व रिकॉर्ड तोड़ा!

Web Summary : 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी ने अंडर-19 मैच में 14 छक्के मारकर 17 साल पुराना विश्व रिकॉर्ड तोड़ा। यूएई के खिलाफ 171 रनों की पारी में 9 चौके शामिल थे और उन्होंने माइकल हिल के 12 छक्कों के रिकॉर्ड को पीछे छोड़ा। अब वे शीर्ष दावेदार हैं।

Web Title : Vaibhav Suryavanshi: 14-Year-Old Breaks World Record with Sixes!

Web Summary : Vaibhav Suryavanshi, 14, smashed 14 sixes in an under-19 match, breaking a 17-year-old world record. His 171-run innings against UAE included 9 fours and surpassed Michael Hill's previous record of 12 sixes. He is now a top contender.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.