"पहला ही उड़ा देंगे…" संजूनं शेअर केला वैभव अन् कोच द्रविड यांच्यातील खास संवादाचा किस्सा (VIDEO)

संजूनं वैभवला रोखलं अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:22 IST2026-03-16T18:05:14+5:302026-03-16T18:22:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Vaibhav Suryavanshi React On IPL Debut First Ball Six Sanju Samson Share Meeting Conversation Among Rahul Dravid And Vaibhav | "पहला ही उड़ा देंगे…" संजूनं शेअर केला वैभव अन् कोच द्रविड यांच्यातील खास संवादाचा किस्सा (VIDEO)

"पहला ही उड़ा देंगे…" संजूनं शेअर केला वैभव अन् कोच द्रविड यांच्यातील खास संवादाचा किस्सा (VIDEO)

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बीसीसीआयच्या 'नमन अवॉर्ड्स' सोहळ्यात अनेक आजी-माजी क्रिकेटर्संनी हजेरी लावली होती.   भारतीय क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यासाठी बीसीसीआयकडून दरवर्षी हा सोहळा आयोजित करण्यात येतो. पण यावेळी हा सोहळा अधिक खास ठरला. कारण यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात महिला विश्वचषक २०२५, टी-२० विश्वचषक २०२६, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, अंडर-१९ विश्वचषक तसेच अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघांनी मिळवलेल्या यशाचा उत्सव साजरा करण्यात आला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

संजूनं वैभवला रोखलं अन्....

या कार्यक्रमात युवा स्फोटक बॅटर वैभव सूर्यवंशी हा देखील उपस्थितीत होता. दिग्गजांच्या पंक्तीत बसून या प्रतिभावंत युवा क्रिकेटपटू वेगवेगल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसला. वैभव सूर्यवंशी आपल्या पदार्पणातील सामन्यासंदर्भात बोलत असताना संजू सॅमसन याने त्याला रोखलं अन् त्याची नक्कल करून दाखवत मॅच आधी रणनिती कशी ठरली? त्यासंदर्भातील खास किस्सा शेअर केला. 

BCCI Naman Awards 2026: द्रविड-मिताली-बिन्नींच्या शिरेपेचात मानाचा तुरा; पाहा विजेत्यांची यादी

IPL पदार्पणापूर्वीचा खास संवाद

गत हंगामात वैभव सूर्यवंशी याने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून IPL मध्ये पदार्पण केले होते. लखनौ सुपर जाएंट्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. याआधी ड्रसिंग रुममध्ये काय घडलं? यासंदर्भातील खास किस्सा बीसीसीआयच्या कार्यक्रमातील मुलाखतीमधून समोर आला आहे. 

“अगर हमें पहला मिला तो पहला ही उड़ा देंगे.”


वैभव सूर्यवंशी याला पदार्पणाचा अनुभव कसा होता? सामन्याआधी कॅप्टन कोच यांच्यासोबत काय संवाद झाला होता? यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आले. यावेळी संजूनं वैभवला रोखतं छोटा पॅक बडा धमाका मैदानात दिसण्याआधी काय घडलं ते सांगितलं. संजू म्हणाला की, त्या सामन्यापूर्वी संघाचा आत्मविश्वास उंचावलेला होता. राहुल द्रविड यांनी पदार्पणाआधी वैभवला आपल्या खोलीत बोलावून घेतले होते. ज्यावेळी द्रविड यांनी गेम प्लॅन काय? हा प्रश्न विचारला त्यावेळी वैभवनं बिहारी टोनमध्ये "कुछ नहीं सर हम खेलेंगे...   “अगर हमें पहला मिला तो पहला ही उड़ा देंगे.” असा रिप्लाय दिला होता. संजूनं अगदी युवा बॅटरची नक्कल करत हा किस्सा सुनावला.
 

Web Title : संजू ने वैभव और कोच द्रविड़ के बीच खास बातचीत साझा की।

Web Summary : बीसीसीआई पुरस्कार समारोह में, संजू ने वैभव के आईपीएल डेब्यू का एक मजेदार किस्सा साझा किया। वैभव ने राहुल द्रविड़ से कहा कि अगर मौका मिला तो वह पहली गेंद पर छक्का मारेंगे, जिससे टीम का आत्मविश्वास झलकता है।

Web Title : Sanju shares Vaibhav and Coach Dravid's special conversation at BCCI event.

Web Summary : At the BCCI awards, Sanju shared a funny anecdote about Vaibhav's IPL debut. Vaibhav told Rahul Dravid he would hit the first ball for a six if given the chance, showcasing the team's confidence.