Vaibhav Suryavanshi Named Captain Of The India U19 : भारताचा युवा स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशी हा क्रिकेटच्या मैदानातील आपल्या दमदार कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत आहे. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी IPL मध्ये विक्रमी शतकी खेळीनंतर तो प्रत्येक स्पर्धा गाजवताना दिसला. कमी वयात फलंदाजीतील कर्तृत्व सिद्ध केल्यावर आता U19 वर्ल्ड कप स्पर्धेआधी BCCI नं त्याला थेट U19 टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नव्या वर्षात वैभव सूर्यवंशीच्या नावे होणार नवा विक्रम
भारतीय अंडर १९ संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत युवा भारतीय संघाचे नेतृत्व हे वैभव सूर्यवंशीकडे सोपवण्यात येणार आहे. BCCI नं त्याला कॅप्टन करताच त्याच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. तो अंडर १९ मध्ये संघाचे नेतृत्व करणारा सर्वात युवा कर्णधार झाला आहे. नव्या वर्षात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच त्याच्या नावे या नव्या विक्रमाची नोंद होईल.
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
आयुष म्हात्रेच्या अनुपस्थितीत १४ वर्षांच्या पोराला लागली कॅप्टन्सीची लॉटरी
U19 संघाचा नियमित कर्णधार आयुष म्हात्रे आणि उप कर्णधार विहान मल्होत्रा दोघेही दुखापतीमुळे U19 वर्ल्ड कप स्पर्धेआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या युथ वनडे मालिकेला मुकणार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व हे १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे सोपवण्यात आले आहे. तर एरोन जॉर्ज याच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आली आहे.
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (अंडर-19)
- शनिवार, ३ जानेवारी, पहिला एकदिवसीय सामना (विलोमूर पार्क)
- सोमवार, ५ जानेवारी, दुसरा एकदिवसीय सामना (विलोमूर पार्क)
- बुधवार, ७ जानेवारी, तिसरा एकदिवसीय सामना (विलोमूर पार्क)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा U-19 संघ
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), उपकर्णधार (एरोन जॉर्ज), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर. एस. अंब्रिश, कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल, मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उधव मोहन, युवराज गोहिल, राहुल कुमार.
Web Summary : Young Vaibhav Suryavanshi, known for his explosive batting, will captain India's U19 team in the upcoming series against South Africa. Due to injuries of regular captain and vice captain, BCCI appointed Suryavanshi as the youngest captain, setting a new record. This is before the U19 World Cup.
Web Summary : युवा वैभव सूर्यवंशी अपनी विस्फोटक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, दक्षिण अफ्रीका के खिलाफ आगामी श्रृंखला में भारत की U19 टीम का नेतृत्व करेंगे। नियमित कप्तान और उप-कप्तान की चोटों के कारण, बीसीसीआई ने सूर्यवंशी को सबसे कम उम्र का कप्तान नियुक्त किया, एक नया रिकॉर्ड स्थापित किया। यह U19 विश्व कप से पहले है।