Vaibhav Suryavanshi Arjun Tendulkar Hit Sho In (DY Patil T20 Tournament :आगामी इंडियन प्रीमीयर लीग स्पर्धेआधी वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर ही जोडी एकाच संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत सुरू असलेल्या डी. वाय पाटील स्पर्धेत (DY Patil T20 Tournament) स्पर्धेत दोघांनी केलेली खास कामगिरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
वैभव सूर्यवंशीनं ३३१ च्या स्ट्राइक रेटने कुटल्या धावा
इंडियन नेव्ही संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २२० धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना यश धुल आणि वैभव सूर्यवंशी ही सलामीची जोडी मैदानात उतरली. वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत गोलंदाजांवर तुटून पडत धावांचा पाऊस पाडला. त्याने केवळ १४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. एकूण १९ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ५ षटकारांसह त्याने ६३ धावांची तुफानी खेळी केली. त्याने ३३१.५८ च्या स्ट्राईक रेटनं या धावा काढल्या. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे डीवाय पाटील ब्लू संघाने १९.१ षटकांत ५ विकेट्स राखून सामना जिंकला.
अर्जुन तेंडुलकर ठरला सामनावीर
या सामन्यात वैभव सूर्यवंशीशिवाय अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यानेही महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २९ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गोलंदाजीत त्याने एक विकेट घेतली. त्यामुळे तो सामनावीर ठरला.