Vaibhav Suryavanshi Breaks Multiple Records : अंडर १९ वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा १४ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध षटकार चौकारांसह विक्रमांची अक्षरश: 'बरसात' केल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या फायनल लढतीत वैभव सूर्यवंशीचं द्विशतक थोडक्यात हुकलं. पण ८० चेंडूतील १७५ धावांच्या खेळीत त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. यूथ वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमसह अंडर १९ मधील सक्रीय खेळाडू असलेल्या बांगलादेशच्या अजीजुल हकीमलाही त्याने मागे टाकले. एवढेच नाही तर कॅरेबियन स्फोटक बॅटर निकोलस पूरनच्या विक्रमालाही त्याने सुरुंग लावला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाबर आझमच्या विक्रमाला सुरुंग
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ३५ धावा करताच वैभव सूर्यवंशी यूथ वनडेत पाकिस्तानच्या बाबर आझमला ओव्हरटेक केले. बाबर आझमनं यूथ वनडेत अर्थात १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात ३६ सामन्यात १२७१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. यात ३ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. १२९ धावा ही बाबरची यूथ वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. वैभव सूर्यवंसी हा U19 वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावे होता. त्याने २०१० मध्ये १५ वर्षे आणि ९२ दिवस वय असताना वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले होते. १४ वर्षे ३१६ दिव वयात वैभव सूर्यवंशीनं हा डाव साधला आहे. यूथ वनडेतील हे त्याचे चौथे शतक आहे.
१५ षटकार, १५ चौकार; ८० चेंडूत १७५ धावा! फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने मोडले तब्बल ४ विक्रम
प्लेऑफ्स आणि फानयलमधील नवा विक्रमवीर, निकोलस पूरनला टाकले मागे
वैभव सूर्यवंशीला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिले द्विशतक झळाकवण्याची संधी होती. पण २५ धावांनी तो या संधीला मुकला. पण १७५ धावांच्या खेळीसह त्याने कॅरेबियन स्फोटक बॅटर निकोलस पूरनचा विक्रम मोडीत काढला आहे. याआधी २१४ च्या अंडर १९ वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये निकोलस पूरनं याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४३ धावांची खेळी केली होती. ही प्लेऑफ्समधील आतापर्यंतची सर्वाच्च धावसंख्या होती. वैभव सूर्यवंशीनं हा विक्रमही मोडीत काढला आहे. फायनलमध्ये उन्मुक्त चंद याने याआधी नाबाद १११ धावांच्या खेळीचा विक्रम होता. २०१२ च्या हंगामात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. हा विक्रमही वैभव सूर्यवंशीनं मोडला आहे.
भारतासाठी यूथ वनडेत सर्वोच्च खेळी करणारे फलंदाज
- अंबाती रायुडू - १७७* (इंग्लंड U19 विरुद्ध, २००२)
- वैभव सूर्यवंशी - १७५ (इंग्लंड U19 विरुद्ध, २०२६ U19 वर्ल्ड कप फायनल)
- वैभव सूर्यवंशी - १७१ (UAE U19 विरुद्ध, दुबई – डिसेंबर)