Rinku Singh Gets Surprise Visit Of Fiancée MP Priya Saroj Video : भारतीय टी-२० संघाचा नवा स्टार अन् मॅच फिनिशरच्या रुपात आपली ओळख निर्माण करणारा रिंकू सिंह सध्या UP टी-२० लीगमध्ये व्यग्र आहे. या लीगसाठी प्रॅक्टिस करत असताना होणारी पत्नी आणि खासदार प्रिया सरोज यांच्याकडून क्रिकेटरला सरप्राइज मिळालं. शहीद विजय सिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्रेटर नोएडा येथील रिंकू सिंग अन् प्रिया सरोज यांच्या भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फ्लॅट सँडेल अन् सूटमधील सिंपल लूक
खासदार मॅडम प्रिया सरोज यांनी थेट मैदानात एन्ट्री मारत प्रॅक्टिस करत असलेल्या रिंकूची भेट घेतली. काहीवेळ गप्पा गोष्टी केल्यावर त्या मैदानातून निघून केल्या. रिंकूसोबतच्या खास भेटीत प्लॅट सँडेल आणि सूटमधील सिंपल लूकसह देखील प्रिया सरोज यांनी लक्षवेधून घेतलं. या जोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Smriti Mandhana : भावामुळं डावखुरी झाली अन् सर्वांपेक्षा 'उजवी' ठरली! क्रिकेटच्या मैदानातील क्वीनची खास स्टोरी
आधीपासूनच ते एकमेकांना ओळखत होते, पण...
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांनी काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला होता. साखरपुड्याचा मुहूर्त निघाल्यावरच खासदार मॅडम प्रिया सरोज यांनी प्रेमात रिंकू सिंगची विकेट घेतल्याचे समोर आले. खरंतर याआधी पासूनच ते एकमेकांना ओळखत होते. पण ही गोष्ट त्यांनी कुणालाही कळू दिली नव्हती. आता लग्नाआधी जोडी एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसते.
गत हंगामात दिसला नाही जलवा, आता...
१७ ऑगस्टपासून UP टी २० लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत रिंकू सिंग मेरठ मावेरिक्स संघाकडून मैदानात उतरणार आहे. याआधीच्या हंगामात रिंकूला या स्पर्धेत आपला जलवा दाखवता आला नव्हता. त्यामुळेच यावेळी तो अधिक मेहनत घेताना दिसतोय. सामन्यावेळीही त्याला होणारी पत्नी चीअर करताना दिसेली तर नवल वाटू नये.
Web Title: UP T20 League Rinku Singh Gets Surprise Visit Of Fiancée MP Priya Saroj Video Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.