Join us

लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

IPL स्पर्धेनंतर रिंकू सिंह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 22:21 IST

Open in App

Rinku Singh Basic Education Officer : आयपीएलचं मैदान गाजवून टी-२० क्रिकेटमध्ये आपली विशेष छाप सोडत टीम इंडियात एन्ट्री मारणारा रिंकू सिंह याला लग्नाआधी सरकारी नोकरी मिळाली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये  फिनिशरच्या रुपात आपली ओळख निर्माण करणारा रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज या जोडीच्या लग्नाची चर्चा सुरु असताना क्रिकेटरला योगी सरकारने मोठ्या अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने रिंकू सिंह याला शिक्षण विभागात बेसिक शिक्षण अधिकारी (BSA) पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील राज्य सरकारच्या आदेशानुसार, शिक्षण विभागाने त्याच्या नियुक्तीसंदर्भातील तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

थेट भरती नियमावली अंतर्गत मिळाली अधिकारी होण्याची संधी 

रिंकू सिंह याची नियुक्ती आंतरराष्ट्रीय पदक विजेत्याच्या थेट भरती नियमावली २०२२ अंतर्गत करण्यात आली आहे. या नियमालीनुसार क्रीडा क्षेत्रात देशासाठी सर्वोत्तम योगदान देणाऱ्या खेळाडूला सरकारी सेवेत खास संधी देण्याची तरतूद आहे. रिंकू सिंह याने खडतर प्रवास करत क्रिकेटमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच राज्य सरकारने त्याला या कोट्यातून अधिकारी पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics

 नववी नापास रिंकूचा थक्क करून टाकणारा प्रवास एका सामान्य कुटुंबियात जन्मलेला रिंकू सिंह नववी इयत्तेत नापास झाल्यावर शाळा सोडून वडिलांसोबत घरोघरी गॅस सिलेंडर पुरवण्याचे कामही करायचा. रिंकू सिंह याने आंतरराष्ट्रीय शालेय वर्ल्ड कप स्पर्धेत क्रिकेटमधील आपली धमक दाखवत सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना तो प्रकाशझोतात आला. २०२५ च्या मेला लिलावाआधी रिंकू सिंहला शाहरुख खानच्या मालकीच्या KKR संघाने १३ कोटी रुपयांसह रिटेन केले होते. 

साखरपुडा अन् लग्नामुळे चर्चेत आहे रिंकू

क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय IPL नंतर रिंकू सिंह हा आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत आहे. रिंकू सिंह आणि युवा खासदार प्रिया सरोज यांनी साखरपुडा उरकल्याची गोष्ट चांगलीच चर्चेत आहे. ही जोडी १८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार होती. पण काही कारणास्तव लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचीही चर्चा आहे.  

टॅग्स :रिंकू सिंगकोलकाता नाईट रायडर्सभारतीय क्रिकेट संघउत्तर प्रदेश