ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात उमेश यादवनं केलं 'शतक' पूर्ण

दीर्घ विश्रांतीनंतर संघात पुनरागमन केलेला भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज उमेश यादवने आज नव्या विक्रमला गवसणी घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 05:48 PM2017-09-28T17:48:51+5:302017-09-28T17:58:46+5:30

whatsapp join usJoin us
Umesh Yadav completed the 'hundred' in the match against Australia | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात उमेश यादवनं केलं 'शतक' पूर्ण

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात उमेश यादवनं केलं 'शतक' पूर्ण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरु - दीर्घ विश्रांतीनंतर संघात पुनरागमन केलेला भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज उमेश यादवने आज नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बंगळुरुत ऑस्ट्रेलियाबरोबर सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात त्यानं आपल्या वन-डे कारकिर्दीतील 100 बळी पूर्ण केले आहेत. कांगारुंचा कर्णधार स्मीथला बाद करताच त्याच्या नावार हा विक्रम झाला. वन-डेमध्ये 100 बळी घेणारा तो भारताचा 18 वा गोलंदाज आहे. त्यानं हा पराक्रम 71 व्या सामन्यात केला आहे. 

भारताकडून सर्वात कमी वन-डे सामन्यात 100 बळी पूर्ण करण्याच्या यादीत उमेश सहाव्या स्थानावर आहे. सर्वात कमी वन-डेत 100 बळी घेण्याचा विक्रम इरफान पठानच्या नावावर आहे. इरफाननं 59 वन-डेत 100 बळी घेतले आहेत. त्यानंतर जहीर खान (65), अजित अगरकर (67), जवागल श्रीनाथ (68) आणि इशांत शर्मा (70) यांचा क्रमांक लागतो. 

सध्या सुरु असलेल्या सामन्यात वॉर्नर आणि फिंच जोडीनं 35 षटकांत 231 धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. 231 धावांवर वॉर्नर केदारच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर यादवनं कांगारुंना लागोपाठ दोन झटके दिलं. धोकादाय ठरु पाहणाऱ्या फिंचला त्यानं प्रथम बाद केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मीथला विराट कोहलीकरवी बाद करत आपले 100 बळी पूर्ण केले. आजच्या सामन्यात उमेश यादवनं चार कांगारुंना बाद केलं. व्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच या सलामीवीरांनी केलेल्या झंझावाती फटकेबाजीच्या बळावर कांगारुंनी भारतासमोर 335 धावांचे आव्हान ठेवलं आहे. 


100 व्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरची शतकी खेळी 
बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं धडाकेबाज शतक झळकावलं आहे. वॉर्नरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना असल्यामुळे त्याच्यासाठी हे शतक खास आहे. या सामन्यात फलंदाजीसाठी उतरल्यानंतर 100 वा सामना खेळणारा तो ऑस्ट्रेलियचा 28 खेळाडू ठरला. सध्या सुरु असलेल्या मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथचा 100 सामना होता. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक वन-डे सामने खेळण्याचा विक्रम रिकी पॉटिंगच्या नावावर आहे. पॉटिंगनं 374 सामने खेळले आहेत. बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत वॉर्नरनं 103चेंडूचा सामना करताना आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्यानं 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. 
 

Web Title: Umesh Yadav completed the 'hundred' in the match against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.