UAE vs Oman Live Streaming Asia Cup 2025 Live Telecast : आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील सातव्या सामनन्यात यजमान संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमान हे दोन संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला आहे. स्पर्धेतून बाहेर पडण्याआधी एक विजय नावे करण्याची दोन्ही संघांना ही अखेरची संधी असेल. इथं एक नजर टाकुयात UAE अन् Oman यांच्यातील सामना कुठं पाहता येईल अन् कसा आहे दोन्ही संघांचा एकेमकांविरुद्धचा रेकॉर्ड यासंदर्भात सविस्तर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पराभवाचा 'षटकार' अन् UAE अन् Oman यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
UAE अन् Oman या दोन संघांमध्ये आतापर्यंत ५ सामने झाले आहेत. यात यूएईच्या संघाने ३ वेळा बाजी मारलीये. दुसरीकडे ओमानच्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या पराभवासह या दोन्ही संघाने मागील सहा सामन्यात एकही सामना जिंकलेला नाही. ओमान बरोबरीचा डाव साधणार? की यूएई आपला रेकॉर्ड आणखी भारी करणार ते पाहण्याजोगे असेल.कुठं अन् कसा पाहता येईल हा सामना?
संयुक्त अरब अमिराती विरुद्ध ओमान यांच्यातील आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सामना अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात येईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ५:३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. UAE vs Oman यांच्यातील लढतीचे थेट प्रेक्षपणाचे हक्क सोनी स्पोर्ट्स टेलिव्हिजनकडे आहेत. याशिवाय ऑनलाइन Live स्ट्रीमिंगसाठी सोनी Liv ॲप किंवा या वेबसाइटस फॅनकोडवर मोबाइलच्या माध्यमातूनही या सामन्याचा आनंद घेता येईल.
संयुक्त अरब अमिराती संघ
अलिशान शराफू, मुहम्मद वसीम (कर्णधार), मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), आसिफ खान, हर्षित कौशिक, ध्रुव पराशर, सिमरनजीत सिंग, हैदर अली, जुनैद सिद्दिकी, मुहम्मद रोहिद खान, मुहम्मद फारूख, आर्यांश शर्मा, मतिउल्ला खान, एथन जवादुल्ला, मुहम्मद खानदुल्ला, साउदउल्ला खान.
ओमान संघ
आमिर कलीम, जतिंदर सिंग (क), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (डब्ल्यू), शाह फैसल, हसनैन शाह, मोहम्मद नदीम, जिक्रीया इस्लाम, सुफयान मेहमूद, शकील अहमद, समय श्रीवास्तव, करण सोनावळे, आशिष ओडेदरा, मोहम्मद इम्रान, आर्यन बिश्त, सुफयान खान, सुफयान खान