U19 Asia Cup 2025, India vs Malaysia Match Vaibhav Suryavanshi Fifty : १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील मलेशियाविरुद्धच्या लढतीत वैभव सूर्यवंशीची बॅट पुन्हा एकदा तळपली. मलेशियाविरुद्धच्या लढतीत १४ वर्षीय पोरानं कडक अर्धशतकी खेळीसह आपल्या फलंदाजीतील खास नजराणा पेश केला. तो ही खेळी आणखी एका मोठ्या खेळीत रुपांतरीत करेल, असे वाटत होते. पण अर्धशतकावरच त्याच्या खेळीला ब्रेक लागला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय U19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे पुन्हा फेल
वैभव सूर्यवंशी याने १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील UAE विरुद्धच्या सलामीच्या लढतीत विक्रमी १७१ धावांची खेळी साकारली होती. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो अवघ्या ५ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर भारतीय संघ आशिया कप स्पर्धेतील तिसरा सामना खेळण्यासाठी ICC अकादमीच्या दुबईच्या मैदानात उतरला. मलेशिवाय विरुद्धच्या लढतीत भारतीय U19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो ७ चेंडूत १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला वैभव सूर्यवंशीचा जलवा पाहायला मिळाला.
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
वैभव सूर्यवंशीची कडक अर्धशतकी खेळी
मलेशिया विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने २०० च्या स्ट्राइक रेटनं २५ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. त्याची ही खेळी ५ चौकार आणि ३ उत्तुंग षटकाराने बहरलेली होती. तो आणखी एक मोठी खेळी करण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत होते. पण अर्धशतकी खेळीनंतर पुढच्या चेंडूवरच त्याने आपली विकेट गमावली. मुहम्मद अक्रमच्या गोलंदाजीवर तो झेलबाद होऊन परतला.
U19 आशिया कप स्पर्धेत नंबर वन कामगिरी अन् दुबईत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची क्रेझ
आशिया कप स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यातील अर्धशतकी खेळीच्या जोरावर वैभव सूर्यवंशी U19 आशिया कप स्पर्धेतील यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी पोहचला आहे. ३ सामन्यानंतर त्याच्या खात्यात २२६ धावा जमा आहेत. पाकिस्तानच्या समीर मिन्हास याला मागे टाकत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी पोहचला आहे. सातत्याने जबरदस्त कामगिरीसह लक्षवेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीची दुबईत क्रेझ पाहायला मिळत आहे. मलेशियाविरुद्धच्या सामन्याआधी चाहत्यांनी १४ वर्षीय पोराच्या स्वाक्षरीसह त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केल्याचेही पाहायला मिळाले. त्याच्या कडक अर्धशतकी खेळीसह ही गोष्टही चर्चेचा विषय ठरत आहे.
Web Summary : Vaibhav Suryavanshi, 14, dazzled in the U19 Asia Cup, hitting a fifty against Malaysia with a 200 strike rate. He leads the tournament in runs after scoring 171 against UAE. Suryavanshi's performance has made him a fan favorite in Dubai.
Web Summary : 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी ने U19 एशिया कप में मलेशिया के खिलाफ 200 की स्ट्राइक रेट से अर्धशतक बनाया। यूएई के खिलाफ 171 रन बनाने के बाद वह टूर्नामेंट में सबसे ज्यादा रन बनाने वाले खिलाड़ी हैं। सूर्यवंशी का प्रदर्शन दुबई में प्रशंसकों को खूब भा रहा है।