Vaibhav Suryavanshi Record With Century U19 Asia Cup 2025 IND vs UAE 1st Match : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने विक्रमी सेंच्युरीसह १९ आशिया कप स्पर्धेची एकदम धमाक्यात सुरुवात केली आहे. ८६ धावांवर युएईच्या फलंदाजांनी वैभवच्या खेळीला ब्रेक लावण्याची संधी सोडली. कॅच सुटल्यावर वैभव सूर्यवंशीनं ५६ चेंडूत शतकाला गवसणी घातली. अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील हे तिसऱ्या क्रमांकाचे जलद शतक ठरले. शतकापर्यंत पोहचण्यासाठी त्याने पाच चौकार आणि ९ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.
वर्ल्ड रेकॉर्डची संधी थोडक्यात हुकली
UAE विरुद्ध वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. याआधी एमर्जिंग नेशन्स आशिया कपमध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर झेल सुटल्याचा फायदा घेत या संघाविरुद्ध १४४ धावा केल्या होत्या. या सामन्यात ८६ धावांवर असताना लाँग-ऑनवर त्याचा झेल सुटला. याच षटकात षटकार मारत वैभव सूर्यवंशी नव्वदीच्या घरात पोहचला. या सामन्यात त्याला अंडर १९ मधील सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम मोडण्याची संधी होती. पण ५६ चेंडू घेतल्यामुळे त्याचा हा मोठा विक्रम हुकला. अंडर १९ मध्ये सर्वात जलदशतकी रेकॉर्ड हा ५२ चेंडूतील आहे.
युवा वनडेतील दुसऱ्या शतकी खेळीसह विक्रमांचा सिलसिला कायम!
युवा वनडे सामन्यातील वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून आलेली हे दुसरे शतक आहे. याआधी जुलैमध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध १४३ धावांची खेळी केली होती. अंडर १९ आशिया कप स्पर्धेआधी वैभव सूर्यवंशी याने देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र संघाविरुद्ध शतकी खेळीसह त्याने या स्पर्धेत शतक झककवणारा सर्वात युवा फलंदाज ठरला होता. अंडर १९ आशिया कप स्पर्धेतही त्याचा विक्रमावर विक्रम प्रस्थापित करण्याचा धमाका कायम आहे. आशिया कप हा भारतीय संघासाठी २०२६ अंडर-१९ वनडे वर्ल्ड कपच्या स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मोठ्या स्पर्धेत वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा आपली खास छाप सोडली आहे.
Web Summary : Fourteen-year-old Vaibhav Suryavanshi began the U19 Asia Cup with a record-breaking century. After a dropped catch at 86, Suryavanshi reached his century in 56 balls. This is the third-fastest century in Asia Cup history, marking a sensational start to the tournament.
Web Summary : चौदह वर्षीय वैभव सूर्यवंशी ने रिकॉर्ड शतक के साथ अंडर-19 एशिया कप की शानदार शुरुआत की। 86 रन पर कैच छूटने के बाद, सूर्यवंशी ने 56 गेंदों में शतक पूरा किया। यह एशिया कप के इतिहास का तीसरा सबसे तेज शतक है, जो टूर्नामेंट की सनसनीखेज शुरुआत है।