Join us

MS Dhoni And Kapil Dve: यूएस ओपन पाहण्यासाठी महेंद्रसिंग धोनीसह दिग्गजांनी लावली हजेरी, फोटो व्हायरल 

सध्या न्यूयॉर्कच्या धरतीवर यूएस ओपन २०२२ चा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 13:32 IST

Open in App

नवी दिल्ली :  सध्या न्यूयॉर्कच्या धरतीवर यूएस ओपन २०२२ (US Open 2022) चा थरार रंगला आहे. या स्पर्धेत नामांकित खेळाडू आपले क्रीडा कौशल्य दाखवून चाहत्यांना आकर्षित करत आहेत, तर टेनिस चाहते स्टँडवर बसून खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत विविध क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींनी सामने पाहण्यासाठी हजेरी लावली होती. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताचे दोन महान कर्णधार, एमएस धोनी आणि कपिल हे देखील खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसले. 

यूएस ओपनच्या अधिकृत वेबसाइटवरून, टूर्नामेंटने 10 व्या दिवशी खेळ पाहण्यासाठी आलेल्या काही सेलिब्रिटींचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांचा देखील समावेश आहे. धोनी आणि कपिल देव यांच्यासोबत प्रसिद्ध शेफ विकास खन्नाही सामन्याचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. 

नोव्हाक जोकोविच स्पर्धेला मुकला लक्षणीय बाब म्हणजे यंदाची ही स्पर्धा स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि राफेल नदाल यांच्यासाठी काही विशेष राहिली नाही. शेवटचा ग्रँडस्लॅम खेळणाऱ्या सेरेना विल्यम्सला तिसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉमलजानोविककडून पराभव पत्करावा लागला. तर पुरुष एकेरीत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या राफेल नदालला अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोने पराभवाची धूळ चारली. तसेच यूएस ओपन २०२२ मध्ये रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविचसारखे स्टार खेळाडू सहभागी झाले नाहीत. फेडरर बर्‍याच दिवसांपासून मैदानाबाहेर आहे आणि तो लवकरच परतणार आहे. नोव्हाक जोकोविचने कोरोनाची लस न घेतल्यामुळे त्याला यूएस ओपनमध्ये सहभागी होता आले नाही. 

आगामी IPL हंगामात धोनी खेळणार भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनी मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून लांब असल्यामुळे तो इतर खेळांचा आनंद घेत आहे. मागील वर्षीचा आयपीएल हंगाम संपल्यावर धोनी ब्रिटनला देखील गेला होता, जिथे तो भारत-इंग्लंड मालिका आणि विम्बल्डन चॅम्पियनशिप दरम्यान दिसला होता. आता धोनी ब्रिटनमधून परतल्यानंतर एका महिन्यानंतर अमेरिकेत पोहोचला आहे. विशेष बाब म्हणजे धोनी आयपीएल २०२३ मध्ये खेळणार असून चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे नेतृत्वही करणार आहे. 

टॅग्स :अमेरिकन ओपन टेनिसमहेंद्रसिंग धोनीकपिल देवनोव्हाक जोकोव्हिचसेरेना विल्यम्स
Open in App