Join us
Daily Top 2Weekly Top 5

Smriti Mandhana Wedding Postponed : स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली! लग्न पुढे ढकलले

स्मृतीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:31 IST

Open in App

Smriti Mandhana Palash Muchhal's Wedding Postponed : विश्वविजेत्या भारतीय महिला संघाची उप कर्णधार आणि नॅशनल क्रश स्मृती मंधाना आणि  संगीतकार पलाश मुच्छाल यांच्या लग्नात विघ्न आले आहे. घरातील मेडिकल इमर्जन्सीमुळे स्मृती-पलाश यांचे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.  रविवारी २३ नोव्हेंबरला दुपारी लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला होता. लग्न विधी आधीचे कार्यक्रम सुरु असताना अचानक वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला. स्मृती मंधानाचे मॅनेजर तौहिन मिश्रा यांनी यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे.  

स्मृती मंधानाचे मॅनेजर तौहिन मिश्रा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ब्रेकफ्रास्ट करत असताना स्मृती मंधाना यांचे वडील श्रीनिवास मंधांना यांची तब्येत बिघडली. थोडा वेळ वाट पाहिल्यावर रुग्णवाहिका बोलवून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सध्याच्या घडीला ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. स्मृतीचं वडिलांसोबतचे बॉन्डिंग एकदम खास आहे. त्यामुळेच वडिलांची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय तिने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले आहे. 

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छाल जोडीनं २३ नोव्हेंबर रोजी आयुष्याची नवी भागीदारी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. अगदी जवळच्या मोजक्या मंडळींच्या साक्षीन सांगलीमध्ये विवाह समारंभ पार पडणार होता. सगळी तयारी झाली होती. पण अचानक वडिलांची तब्येत बिघडली.  महिला क्रिकेटरच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Smriti Mandhana's wedding postponed due to father's illness.

Web Summary : Cricketer Smriti Mandhana's wedding to musician Palash Muchhal has been postponed. The decision was made due to Smriti's father's sudden illness on the wedding day. Family health is the priority.
टॅग्स :स्मृती मानधनाऑफ द फिल्डसांगली