Join us

Rohit Sharma wife Ritika Reaction, IPL 2022: रोहितची पत्नी रितिकाची रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल.. पाहा तेव्हा मैदानात नक्की काय घडलं?

राजस्थानने २३ धावांनी केला मुंबईचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 15:43 IST

Open in App

Rohit Sharma wife Ritika Reaction, IPL 2022: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात शनिवारी सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने १९३ धावा केल्या. सलामीवीर जोस बटलरच्या (Jos Buttler) शानदार शतकाच्या जोरावर त्यांना मोठी धावसंख्या उभारणं शक्य झालं. पण मुंबई इंडियन्सच्या संघातून सलामीवीर व कर्णधार रोहित शर्माला मोठी धावसंख्या करता आली नाही. सलग दुसऱ्यांदा मोठी धावसंख्या उभारण्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला. रोहित केवळ १० धावा करू शकला. ५ चेंडूत १० धावा केल्यानंतर प्रसिध कृष्णाच्या चेंडूवर रोहित शर्मा झेलबाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर त्याची पत्नी रितिका सजदेह नाराज झाली. तिची नाराजी तिच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्टपणे समजली. तसेच, रितिकाचा तो फोटोदेखील सोशल मीडियावर  व्हायरल झाला.

रितिका आपली मुलगी समायरासह स्टेडियममध्ये बसली होती. त्यावेळी रोहित शर्माची विकेट पडताच रितिका पूर्णपणे निराश झाली. रितिका सजदेह IPLच्या सुरुवातीपासूनच रोहित शर्मासोबत मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये आहे. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा रोहित शर्मा हा हुकूमी एक्का होता. त्याने मोठी खेळी केली असती तर सामन्यात नक्कीच रंगत आली असती. पण तोच स्वस्तात माघारी परतल्यानंतर रितिकाचा हिरमोड झाला.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने या हंगामातील पहिले शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला केवळ १७० धावाच करता आल्या. २३ धावांच्या फरकाने मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई इंडियन्सकडून इशान किशनने ५४ तर तिलक वर्माने ३३ चेंडूत ६१ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी घोर निराशा केली.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्ससोशल मीडिया
Open in App