Join us

सलग तीन षटकार ठोकून झळकावलं दमदार शतक, ३६९ धावा करत रचला ILT20 मध्ये इतिहास

Tom Banton Record, ILT20 : टॉम बँटनने तुफान फटकेबाजी करत संघाला मिळवून दिला मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:48 IST

Open in App

Tom Banton Record, ILT20 : टी२० क्रिकेट म्हणजे फलंदाजांचा खेळ असं सुरुवातीपासूनच म्हटलं जातं. फार कमी वेळी या सामन्यांमध्ये गोलंदाजांच्या कामगिरीबाबत बोललं जातं, पण सहसा टी२० क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचण्याचा प्रकार घडतो. सध्यादेखील ILT20 लीग स्पर्धेत अशाच तडाखेबंद खेळींची चर्चा आहे. इंग्लंडचा फलंदाज टॉम बँटन याने केलेल्या फटकेबाजीबद्दल सारेच अवाक झालेत. त्याने नुकतेच स्फोटक शतक झळकावले. विशेष म्हणजे त्याने सलग तीन षटकार खेचत शतक पूर्ण केले. गेल्या ८ दिवसांत त्याने दुसऱ्यांदा अशी फटकेबाजी केली आहे. या शतकाच्या जोरावर त्याने ILT20 मध्ये इतिहास रचला आहे.

तीन षटकार लगावत ठोकलं शतक

टॉम बँटनने २७ जानेवारी रोजी डेझर्ट वायपर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ५५ चेंडूत आपले दुसरे शतक झळकावले. या सामन्यात त्याने ७ षटकार आणि ९ चौकार मारले आणि १९० च्या स्ट्राईक रेटने १०५ धावा केल्या. विशेष बाब म्हणजे डेझर्ट वायपर्सविरुद्ध सलग तीन षटकार ठोकून त्याने आपले दुसरे शतक पूर्ण केले. १९ जानेवारीला त्याने शारजाह वॉरियर्स विरुद्धही शतक ठोकले होते.

३६९ धावा, रचला इतिहास

बँटनने ILT20 मध्ये दोन शतके झळकावली. असे एकाच हंगाम करणार तो पहिलाच खेळाडू ठरला.  त्याने ILT20 मध्ये ३६९ धावा केल्या. यासह लीगच्या सध्याच्या मोसमात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला. टॉम बँटनने ८ सामन्यात १५६ च्या स्ट्राईक रेटने १६ षटकार आणि ३८ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या आहेत. २०२४ च्या सुरुवातीपासूनच तो दमदार कामगिरी करताना दिसत आहे. तेव्हापासून त्याने T20 क्रिकेटमध्ये १५१ च्या स्ट्राइक रेटने १,१३४ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने २ शतके आणि ७ अर्धशतके देखील केली आहेत.

टॅग्स :टी-20 क्रिकेटइंग्लंडसोशल मीडिया