Join us

Asia Cup 2022, Rohit Sharma : रोहित शर्माच्या मनात नेमकं काय चाललंय? ४ सप्टेंबरला सौरव गांगुलीसह मोठी घोषणा करणार

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या मनात काहीतरी सुरू आहे... भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा पूर्णवेळासाठी हाती घेतल्यानंतर रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 19:59 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या मनात काहीतरी सुरू आहे... भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा पूर्णवेळासाठी हाती घेतल्यानंतर रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक २९  सामन्यांचा विक्रम, सलग ७ सामने जिंकणारा कर्णधार असे अनेक विक्रम त्याने नावावर केले आहेत. पण, ४  सप्टेंबरला तो यापेक्षा काहीतरी मोठं करायला जाणार आहे आणि त्याची घोषणा त्याने आज इंस्टाग्राम स्टोरीवरून केली आहे.

हाँगकाँगविरुद्धच्या लढतीत रोहितने २१ धावा केल्या. पण, त्याने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५०० धाव करणारा तो जगातला पहिला पुरुष फलंदाज ठरला. रोहितने १३४ सामन्यांत ३२.१२च्या सरासरीने ३५०२+ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ३४९७ धावांसह दुसऱ्या, तर विराट कोहली ३३४३ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १२ हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशा पराक्रम करणारा तो १५वा ओपनर फलंदाज ठरला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रोहितने चौथे स्थान पटकावले. वीरेंद्र सेहवाग ( १५७५८), सचिन तेंडुलकर ( १५३३५) व सुनील गावस्कर ( १२२५८) हे आघाडीवर आहेत. शिखर धवनच्या १०७२१ धावा आहेत.

पण, आज चर्चा आहे ती त्याच्या इंस्टा पोस्टची... रोहित काहीतरी नवीन करणार आहे, याची घोषणा त्याने केली. ४ सप्टेंबरला रोहितच्या नव्या इनिंग्जचा ट्रेलर लाँच केला जाणार आहे. ही इनिंग्ज सिनेसृष्टीशी निगडीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याने लिहिले आहे की, माझ्या पोटात फुलपाखरू उडत आहेत. पदार्पणाचा ट्रेलर ४ सप्टेंबरला #MegaBlockbuster

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यानेही असाच पोस्टर पोस्ट केला आहे.

टॅग्स :रोहित शर्माएशिया कप 2022भारतीय क्रिकेट संघ
Open in App