Tim David Smashes Fastest T20I Century With Andre Russell Bat : वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने कसोटी मालिका २-० अशी आपल्या नावे केल्यावर तिसऱ्या टी-२० सामना जिंकत ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतही ३-० अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजमधील सेंट किट्स अँड नेव्हिस येथील वॉर्नर पार्कच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम डेविड याने धमाका केला. त्याने अवघ्या ३७ चेंडूत शतक साजरे केले. ऑस्ट्रेलियन संघाकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हे सर्वात जलद शतक ठरले. टी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद शतकी खेळीचा वर्ल्ड रेकॉर्ड संयुक्तपणे भारताचा रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलरच्या नावे आहे. या दोघांनी ३५ चेंडूत शतक झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रसेल बॅटसह टीम डेविडनं दाखवली पॉवर
टीम डेविडच्या टी-२० शतकातील खास गोष्ट ही की, ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेल्या आंद्र रसेलच्या बॅट घेऊन कॅरेबियन गोलंदाजांची धुलाई केली. या सामन्यानंतर खुद्द टीम डेविडनं यासंदर्भातील खास गोष्ट शेअर केली आहे. वेस्टइंडिजचा मसल पॉवर रसल हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला होता.
वर्षभर आंद्रे रसेलची बॅट सोबत बाळगली, कॅरेबियन स्टारनं निवृत्ती घेतल्यावर टीम डेविडच्या हाती तळपली
टीम डेविडनं ६ चौकार आणि ११ षटकाराच्या मदतीने २५० च्या स्ट्राइक रेटसह केलेल्या १०२ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने २१५ धावांचे टार्गेट १६.१ षटकात ६ गडी राखून पार केले. सामनावीर पुरस्कार स्विकारताना टीम डेविडनं आंद्रे रसेलच्या बॅट घेऊन खेळल्याची गोष्ट शेअर केली. तो म्हणाला की, "मी जवळपास वर्षभर रसेलची बॅट सोबत ठेवत होतो. आज ती वापरली. मी पॉवर हिटिंगसाठी खूप मेहनत घेतलीये. आता शॉट सिलेक्शनवर काम करत आहे.
होपसह किंगची खेळी ठरली व्यर्थ
वेस्ट इंडिजकडून सलामीवीर ब्रँडन किंगनं ३६ चेंडूत केलेल्या ६२ धावांच्या खेळीशिवाय शाई होप याने ५७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. पण टीम डेविडच्या धमाक्यासमोर कॅरेबियन सलामीवीरांची खेळी व्यर्थ ठरली.
Web Title: Tim David Smashes Fastest T20I Century For Australia Did You Knwo He Use Andre Russell Bat And Score 102 Against West Indies
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.