ते स्लेजिंग करत होते; मॅच संपेपर्यंत मी शांत राहिलो, मग... तिलक वर्मानं शेअर केली मैदानातील गोष्ट

स्लेजिंग करणाऱ्या पाक खेळाडूंना तिलक वर्मानं जशास तसे उत्तर दिले, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:54 IST2025-09-30T16:52:50+5:302025-09-30T16:54:20+5:30

whatsapp join usJoin us
Tilak Varma On Taunting Of Pakistani Players Says Winning Asia Cup Was The Best Response | ते स्लेजिंग करत होते; मॅच संपेपर्यंत मी शांत राहिलो, मग... तिलक वर्मानं शेअर केली मैदानातील गोष्ट

ते स्लेजिंग करत होते; मॅच संपेपर्यंत मी शांत राहिलो, मग... तिलक वर्मानं शेअर केली मैदानातील गोष्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Tilak Varma On Taunting Of Pakistani Players  : दुबईच्या मैदानात झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानची जिरवली. या  हायहोल्टेज लढतीत तिलक वर्मा पाकिस्तानला पुरून उरला. हारिस राउफच्या अखेरच्या षटकात षटकार खेचत त्यानं टीम इंडिया इंडियासाठी अवघड झालेला पेपर सहज सोपा केला. आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्यावर मैदानात उतरलेल्या तिलक वर्माला फक्त गोलंदाजीच नाही तर स्लेजिंगचाही सामना करावा लागला. खुद्द तिलक वर्मानं मॅचमध्ये जे घडलं त्यासंदर्भात भाष्य केले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

स्लेजिंग करणाऱ्या पाक खेळाडूंना तिलक वर्मानं जशास तसे उत्तर दिले, पण..

दुबईच्या मैदानात अविस्मरणीय खेळी करून टीम इंडियाला आशियाई किंग करणार तिलक वर्मा मायदेशी परतला आहे. हैदराबादमध्ये या युवा डावखुऱ्या बॅटरचे त्याने पाक विरुद्ध केलेल्या खेळीप्रमाणेच धमाकेदार अंदाजात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना टीम इंडियाच्या मॅच विनरनं पाकिस्तान खेळाडूंनी केलेले स्लेजिंग अन् त्यांना जशास तसे प्रत्युतर दिल्याची गोष्टीही सांगितलीये.

टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाह...

ते स्लेजिंग करत होते, त्यावेळी मी शांत राहिलो , कारण..

पाकविरुद्धच्या फायनल मॅचसंदर्भात तो म्हणाला की, आम्ही सुरुवातीलाच तीन विकेट गमावल्या. मैदानात लवकर उतरण्याची वेळ आली त्यावेळी दबाव अन् तणावपूर्ण परिस्थिती होती. ते (पाकिस्तानी खेळाडू) स्लेजिंग करत होते. पण मी त्यांना उत्तर देण्याऐवजी शांत राहून फलंदाजीवर फोकस केला. देशासाठी आम्हाला ट्रॉफी जिंकणं महत्त्वाचे होते. वाद घालून उलट सुलट फटका खेळण्यापेक्षा स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची बेसिक गोष्ट फॉलो केली. जे बोलायचं होतं ते मॅच संपल्यावर बोललो, असे सांगत त्याने पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिल्याची गोष्ट सांगितली.

मॅचनंतर काय घडलं? इथं पाहा तो  व्हायरल व्हिडिओ  

तिलक वर्मानं प्रसारमाध्यमांसमोर तो नेमकं काय म्हटला ते सांगितले नाही. पण मॅचनंतर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात तिलक वर्मानं पाकिस्तानी खेळाडूंची कशी जिरवली ते पाहायला मिळते. मॅचनंतर संघातील सवंगड्यांनीही त्याला पाक खेळाडूंशी भिडण्याला बळ दिल्याचे दिसून येते.  
 

Web Title : तिलक वर्मा ने बताया कैसे एशिया कप के बाद पाकिस्तानी स्लेजिंग को शांत किया।

Web Summary : तिलक वर्मा को एशिया कप फाइनल के दौरान पाकिस्तानी खिलाड़ियों से स्लेजिंग का सामना करना पड़ा। वह शांत रहे, अपनी बल्लेबाजी पर ध्यान केंद्रित किया और भारत की जीत के बाद जवाब दिया। उन्होंने देश के लिए जीतने पर जोर दिया।

Web Title : Tilak Varma reveals how he silenced Pakistani sledging after Asia Cup match.

Web Summary : Tilak Varma faced sledging from Pakistani players during the Asia Cup final. He remained calm, focused on his batting, and responded after India's victory. He emphasized winning for the country.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.