यावेळी रोहित शर्मानं चौकार-षटकारांनी नाही, तर असं जिंकलं चाहत्यांचं मन; ट्रॅफिक पोलिसाच्या नावे लिहिलं पत्र

ही नोट सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 01:20 PM2024-01-17T13:20:09+5:302024-01-17T13:21:10+5:30

whatsapp join usJoin us
This time, Rohit Sharma won the hearts of the fans not with fours and sixes; Special letter written on behalf of traffic police | यावेळी रोहित शर्मानं चौकार-षटकारांनी नाही, तर असं जिंकलं चाहत्यांचं मन; ट्रॅफिक पोलिसाच्या नावे लिहिलं पत्र

यावेळी रोहित शर्मानं चौकार-षटकारांनी नाही, तर असं जिंकलं चाहत्यांचं मन; ट्रॅफिक पोलिसाच्या नावे लिहिलं पत्र

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंदूर येथे अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने एका स्थानिक वाहतूक पोलीस अधिकाऱ्यासाठी एक खास नोट लिहिली आहे. डान्सिंग कॉपी नावाने प्रसिद्ध असलेल्या रणजीत यांनी यापूर्वीच्या भेटीत रोहित शर्माला ऑटोग्राफ मागितला होता, पण तो त्याला मिळाला नव्हता. मात्र, आता रोहितने त्याच्यासाठी एका खास नोटसह ऑटोग्राफ दिला आहे. ही नोट सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे.

रोहितने रणजीतसाठी केवळ ऑटोग्राफच दिला नाही, तर एक मेसेजही दिला आहे. या ट्रॅफिक पोलिसाने रोहितकडून मिळालेल्या ऑटोग्राफचा फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत, 'यापूर्वी भारतीय संघ जेव्हा इंदूरला आला होता, तेव्हा मी रोहित शर्माला भेटलो होतो. मी त्याला ऑटोग्राफ मागितला होता. मात्र सेवेत असल्याने मी तो घेऊ शकलो नाही. हे रोहितला माहीत होते. यावेळी त्याने जाताना भारतीय संघाच्या बस ड्रायव्हर सरांकडे आपला ऑटोग्राफ, भावना आणि माझ्याप्रति असेलले प्रेम शब्दत लिहून दिले. तसेच, क्रेझी मॅन रणजीतपर्यंत पोहोचून देणे, असे म्हटले आहे. कर्णधार साहेब आपल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. खेळाडू केवळ केळानेच महान होत नाही तर, असे विचारच त्याला महान बनवतात. रोहित भाई you are the best.'

रोहितकडे सर्वात यशस्वी कर्णाधार होण्याची संधी -
रोहित शर्माला विश्वचषक 2022 नंतर T20 फॉरमॅटमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अफगाणिस्तान विरुद्धच्या सुरुवातीच्या दोन टी20 सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. यामुळे आता तो तिसऱ्या सामन्यात चांगली खेळी करेल अशी आशा आहे. महत्वाचे म्हणजे रोहित शर्माकडे अफगाणिस्तासोबत होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून सर्वात यशस्वी कर्णाधार होण्याची संधी आहे. यापूर्वी माजी कर्णधार धोनीने भारताला सर्वाधिक 41 T20 सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. रोहितच्या नावेही एवढेच विजय नोंदवले गेले आहेत. अशात एक सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा धोनीचा विक्रम मोडेल.

Web Title: This time, Rohit Sharma won the hearts of the fans not with fours and sixes; Special letter written on behalf of traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.