Join us

तिसरा टी-20 सामना रद्द, मालिका बरोबरीत

पावसामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानचा तिसरा टी-20 सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तीन टी-20 सामन्याची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 20:51 IST

Open in App

हैदराबाद - पावसामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानचा तिसरा टी-20 सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तीन टी-20 सामन्याची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे. भारताने रांचीमध्ये पहिल्या टी-२० सामन्यात 9 गडी राखून विजय मिळवला होता, पण गुवाहाटीमध्ये यजमान संघाला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात कांगारुंनी दमदार पुनरागमन करताना भारताचा 8 विकेटनं दारुण पराभव केला होता. त्यामुळे तिसरा सामना जिंकून दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या निर्धारानं मैदानात उतराणार होते. पण दोन्ही संघाच्या मनसुब्यावर पावसाने पाणी फेरलं आणि सामना रद्द करावा लागला. 

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती त्यामुळे चाहत्यांना येथे धावांचा पाऊस अनुभवाला मिळण्याची शक्यता आहे. येथे नियमित आयपीएलचे सामने होतात, पण टी-२० आंतरराष्ट्रीय सामना प्रथमच होत होता. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाक्रिकेट