Join us

या दोन महिला खेळाडूंचं 'शुभ मंगल सावधान', फोटो व्हायरल

न्यूझीलंडकडून 7 एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणारी हेली जेलसन जलदगती गोलंदाज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 13:59 IST

Open in App

मेलबर्न - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महिला खेळाडूने चक्क लग्नगाठ बांधली आहे. न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू हेली जेनसन आणि ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू निकोला हॅनकॉक या दोघी जीवनासाथी बनल्या आहेत. सोशल मीडियावर या दोघींच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे मेलबर्न स्टार्सनं अधिकृत ट्विटर हँडलवरून नवविवाहित जोडप्याचा फोटो शेअर करून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

न्यूझीलंडकडून 7 एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणारी हेली जेलसन जलदगती गोलंदाज आहे. तर, ऑस्ट्रेलियाच्या निकोला हॅनकॉकने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणच केलं नाही. निकोला ही सध्या मेलबर्न स्टार्ससाठी बिग बॅश लीगमध्ये क्रिकेट खेळते. दरम्यान, गतवर्षी दक्षिण भारत क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू डेन वेन निकर्क आणि जलदगती गोलंदाज मारिजाने कॅप यांनी लग्नगाठ बांधली होती. 

 

टॅग्स :न्यूझीलंडआॅस्ट्रेलियालग्न