आयसीसी महिलांच्या १९ वर्षांखालील टी-२० वर्ल्ड कप संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना प्रत्येक मॅचमध्ये छाप सोडणाऱ्या गोंगाटी त्रिशासह भारताची दुसरी सलामीची बॅटर जी. कमलिनी, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांचा या संघात समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऐतिहासिक शतक अन् प्रत्येक वेळी सर्वोत्तम खेळीसह त्रिशानं सोडलीये विशेष छाप
भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करणारी त्रिशानं यंदाच्या हंगामात शतकी खेळीसह इतिहास रचला होता. ती महिला अंडर १० वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकवणारी पहिली क्रिकेटर ठरली. या शतकी खेळीसह तिने ३०९ धावांसह स्पर्धेत विशेष छाप सोडली. अंतिम सामन्यात तिने १५ धावांत तीन विकेट्सही घेतल्या होत्या. या कामगिरीनुळेच तिला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा पुरस्कारही मिळाला. आयसीसीनं निवडलेल्या संघातही तिला स्थान मिळाले आहे.
त्रिशासह या तिघींचा जलवा
त्रिशाला सलामीची बॅटर जी कमलिनी हिने उत्तम साथ दिल्याचे पाहायला मिळाले. तिने या स्पर्धेत १४३ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये स्पर्धेत हॅटट्रिकचा डाव साधणाऱ्या वैष्णवी शर्मानं एकूण १७ विकेट्स घेतल्या. तिच्या पाठोपाठ १७ वर्षीय आयुषी शुक्ला १४ विकेट्ससह स्पर्धेतील दुसरी यशस्वी गोलंदाज ठरली.
दक्षिण आफ्रिकेसह इंग्लंडच्या प्रत्येकी २-२ खेळाडूंचा समावेश
अंडर १९ महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध फायनल खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील दोन खेळाडूंना आयसीसीच्या संघात स्थान मिळाले आहे. यात कायला रेनेके हिचा समावेश आहे. स्पर्धेत ११ विकेट्स घेणाऱ्या या खेळाडूकडेच कॅप्टन्सीची धूरा दिली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जेमा बोथाने हिला सलामीवीराच्या रुपात आयससीच्या अंडर १९ महिला टी-२० संघात स्थान मिळाले आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या संघातील डेविना पेरिन हिच्यासह विकेट किपर बॅटरच्या रुपात केटी जोन्स या संघाचा भाग आहे. याशिवाय आयस्ट्रेलिया, नेपाळ आणि श्रीलंका संघातील खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.
आयसीसीचा अंडर १९ टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वोत्तम संघ
१. जी त्रिशा (भारत)
२. जेमा बोथा (दक्षिण आफ्रिका)
३. डेविना पेरिन (इंग्लंड)
४. जी कमलिनी (भारत)
५. काओइमहे ब्रे (ऑस्ट्रेलिया)
६. पूजा महातो (नेपाळ)
७. कायला रेनेके (कर्णधार) (दक्षिण आफ्रिका)
८. केटी जोन्स (यष्टीरक्षक) (इंग्लंड)
९. आयुषी शुक्ला (भारत)
१०. चामोदी प्रबोदा (श्रीलंका)
११. वैष्णवी शर्मा (भारत)
१२ . न्थाबिसेंग निनी (दक्षिण आफ्रिका)
Web Title: These four Indian players have made it to the ICC Under-19 World Cup squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.