क्रिकेटमध्ये खेळाडूची उंची ही मैदानावर त्याची ताकद बनते. उंच असण्याचा फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही अतिरिक्त फायदा मिळतो. उंची गोलंदाजाला गोलंदाजी करताना बाउन्सर्ससाठी आणि क्षेत्ररक्षण करताना उंच झेल घेण्यासाठी आणि लांब पावलांनी बॉलपर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरते. तर जाणून घेऊयात भारतातील सर्वात उंच क्रिकेटपटूंसंदर्भात...
अबे कुरुविला : 6 फूट 6 इंच -
अबे कुरुविला भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात उंच गोलंदाजांमध्ये गणले जातात. ते १९९० च्या दशकात टीम इंडियासाठी खेळले. ते वेगवान गोलंदाज होते. त्याची उंची ६ फूट ६ इंच (१.९८ मीटर) होती. जी अजही भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक मानली जाते.
पंकज सिंह : 6 फूट 6 इंच -
राजस्थानच्या पंकज सिंहची उंचीही ६ फूट ६ इंच (१.९८ मीटर) एवढी होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या गोलंदाजीबद्दल त्याचे खूप कौतुक झाले. पंकजने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
इशांत शर्मा : 6 फीट 5 इंच -
भारताच्या सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक, इशांत शर्माही त्याच्या उंचीसाठी आणि लाँग स्पेल टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. ६ फूट ५ इंच (१.९६ मीटर) एवढी उंची असलेल्या इशांतने परदेशातील खेळपट्ट्यांवर उंचीचा पुरेपूर फायदा घेतला आहे आणि भारतीय संघाला अनेक वेळा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
राहुल शर्मा : 6 फूट 4 इंच -
लेग स्पिनर राहुल शर्माची उंचीही 6 फूट 4 इंच (1.93 मीटर) होती. त्याने जरी फारसे आंतरराष्ट्रीय सामने खेळले नसले तरी, उंची आणि फिरकीच्या त्याच्या अनोख्या संयोजनामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे.
शिवम दुबे - 6 फूट 4 इंच -
सध्याच्या पिढीतील अष्टपैलू शिवम दुबेची उंचीही ६ फूट ४ इंच (१.९३ मीटर) एवढी आहे. तो तो फलंदा करताना षटकारांसाठी आणि गोलंदाजी करताना बाउन्सर्सच फेकण्यासाठी प्रसिद्ध आहे.
Web Title: These are the 5 tallest cricketers in India, you will be surprised to know the height of two of them...!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.