WPL Expansion : महिला प्रीमियर लीगमधील (डब्ल्यूपीएल) सध्याच्या पाच संघांमध्ये आणखी भर घालण्याचा कुठलाही विचार नसल्याचे बीसीसीआयने बुधवारी स्पष्ट केले. बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे डब्ल्यूपीएल समितीचे प्रमुख आहेत.
तीन सत्रानंतर संघ वाढविण्याचा बोर्डाचा विचार होता, पण, सध्यातरी लक्ष लीग भक्कम करण्याकडे आहे. आयपीएल अध्यक्ष आणि डब्ल्यूपीएल समिती सदस्य अरुण धुमल म्हणाले की, 'सध्यातरी आमचे लक्ष लीग भक्कम कशी करता येईल याकडे आहे. अतिरिक्त संघाची भर घालण्याआधी लीग भक्कम आणि लोकप्रिय कशी होईल, याचा विचार करू. सध्यातरी संघाची भर घालण्याचा आमचा विचार नाही.'
डब्ल्यूपीएलच्या प्रगतीबाबत धुमल यांनी आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, 'आतापर्यंतच्या तीन सत्रात स्टेडियममधील प्रेक्षक संख्येत भर पडली. प्रसारणाशी संबंधित आकडेवारी उत्साहित करणारी आहे. यामुळे जगभरात महिला क्रिकेटला नवी दिशा लाभली.