स्कूल बस ड्रायव्हर ते टीम इंडियाचा पडद्यामागचा हिरो! विराट कोहलीनं केली होती या ‘हिऱ्याची’ पारख

इथं जाणून घेऊयात कोण आहे तो चेहरा? एक स्कूल बस ड्रायव्हर टीम इंडियाचा पद्यामागचा हिरो कसा झाला? यासंदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:59 IST2026-03-11T16:56:11+5:302026-03-11T16:59:34+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
The Unsung Hero Nuwan Seneviratne Journey From School Bus Driver To Team Indias Secret Weapon In T20 World Cup | स्कूल बस ड्रायव्हर ते टीम इंडियाचा पडद्यामागचा हिरो! विराट कोहलीनं केली होती या ‘हिऱ्याची’ पारख

स्कूल बस ड्रायव्हर ते टीम इंडियाचा पडद्यामागचा हिरो! विराट कोहलीनं केली होती या ‘हिऱ्याची’ पारख

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला एकहाती पराभूत करत सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावत नवा इतिहास रचला. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं. भारतीय संघाच्या यशात सुरुवातीच्या काळात डावलण्यात आलेल्या संजू सॅमसनसह जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून मिरवणाऱ्या बुमराहसह संघातील प्रत्येक खेळाडूनं महत्त्वपूर्ण योगदान दिले ही गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे. पण तुम्हाला माहितीये का? भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकून देण्यात एका स्कूल बस ड्रायव्हरचाही हात आहे. या हिऱ्याची पारख विराट कोहलीनं केली होती. इथं जाणून घेऊयात कोण आहे तो चेहरा? एक स्कूल बस ड्रायव्हर टीम इंडियाचा पद्यामागचा हिरो कसा झाला? यासंदर्भातील खास स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कोण आहे टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन करणारा पडद्यामागचा चेहरा

टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाला जगात भारी ठरवण्यात टीम इंडियातील खेळाडूंशिवाय सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे.त्यापैकीच एक नाव म्हणजे श्रीलंकेचा नुवान नुवान सेनेविरत्ने. श्रीलंकेच्या या गड्यानं सलग दुसऱ्या हंगामात भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात हातभार लावला आहे. नुवान सेनेविरत्ने हा टीम इंडियाचा लेफ्ट-आर्म थ्रोडाउन स्पेशलिस्ट आहे. संघात त्यांना प्रेमाने ‘बव्वा’ म्हणून ओळखले जाते. श्रीलंकेसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मोजके सामने खेळणारा हा चेहरा  नेट्समध्ये वेगवेगळ्या अँगल आणि वेगाने चेंडू टाकून टीम इंडियाच्या फलंदाजांना कसून सराव घेण्याची भूमिका बजावत आहे.

ICC T 20 Rankings : ईशान किशनने पाकिस्तानी साहिबजादाला टाकले मागे; अभिषेक शर्मासह संजूचाही जलवा

कोलंबोमध्ये शाळेची बस चालवणारा नुवान पडद्यामागचा हिरो कसा झाला?

१४ नोव्हेंबर १९७९ मध्ये कोलंबोत जन्मलेल्या नुवान यांचा प्रवास खूपच संघर्षमय होता. त्याने २००४ मध्ये दोन प्रथम श्रेणी सामने खेळले अन् एवढ्यावरच त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याने  कोलंबोतील एका शाळेच्या बसवर ड्रायव्हरच्या रुपात काम केले. दिवसभर बस चालवून तो रात्रीच्या वेळेत कोलंबोतील नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबच्या ग्राउंडवर थ्रोडाउन देत सराव करायचा. तो विराटच्या नजरेत आला अन् त्याच नशीबच पालटलं.

विराट कोहलीनं हिऱ्याची पारख केली  अन् तो टीम इंडियाचा पडद्यामागचा हिरो झाला

२०१७ मध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. यावेळी विराट कोहलीची नजर नुवानवर पडली. त्याच्या थ्रोडाउन कौशल्य पाहून विराट कोहलीनं त्याला भारतीय सपोर्ट स्टाफमध्ये संधी दिली. आज नुवान सेनेविरत्ने हे टीम इंडियाच्या सर्वात विश्वासू सदस्यांपैकी एक आहे. नुवान याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. २०२४ आणि २०२६ मध्ये विश्वविजेत्या संघाचा भाग असणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण आहे, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

Web Title : स्कूल बस ड्राइवर से टीम इंडिया के हीरो: कोहली की दूरदृष्टि!

Web Summary : श्रीलंका के नुवान सेनाविरत्ने, पूर्व स्कूल बस ड्राइवर, टीम इंडिया के थ्रोडाउन विशेषज्ञ हैं। विराट कोहली ने 2017 में उनकी प्रतिभा को पहचाना। 'बव्वा' भारत के सपोर्ट स्टाफ का अहम हिस्सा बनकर वर्ल्ड कप सफलता में योगदान दे रहे हैं।

Web Title : School bus driver to Team India's unsung hero: Kohli's foresight!

Web Summary : Nuwan Seneviratne, a former school bus driver and Sri Lankan cricketer, is Team India's left-arm throwdown specialist. Spotted by Virat Kohli in 2017 for his unique skills, 'Bavva' has become a crucial part of India's support staff, contributing to their World Cup success.