नवी दिल्ली: दिल्ली संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि द. आफ्रिकेचा डोनावन फरेश यांनी आयपीएलच्या उर्वरित सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला असून इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स हा मुंबईकडून अखेरचे दोन साखळी सामने खेळणार आहे. स्टार्कने दिल्लीसाठी ११ सामन्यांत २६.१४ च्या सरासरीने सर्वाधिक १४ गडी बाद केले. त्याच्या अनुपस्थितीत दिल्लीच्या प्ले ऑफच्या अपेक्षांना धक्का बसला. फरेरा या सत्रात केवळ एक सामना खेळला. त्याचा सहकारी ट्रिस्टन स्टब्स हा तीन सामन्यांसाठी दिल्ली संघात परतला.
दिल्लीने प्ले ऑफ गाठल्यास स्टब्स हा डब्ल्यूटीसी फायनलमुळे दिल्लीकडून खेळू शकणार नाही. दिल्लीचा उपकर्णधार फाफ डुप्लेसिस याच्या उपलब्धतेबावत स्पष्टता नाही. मार्क्स स्टोयनिस आणि जोश इंग्लिस हे पंजाब संघातून खेळण्यास तयार झाले. पण ते पहिला सामना खेळू शकणार नाहीत, मुंबईचा फलंदाज जॅक्सने शुक्रवारी 'इन्स्टाग्राम'वर मुंबईच्या विमान प्रवासाचे तिकीट शेअर केले. जोस बटलर हादेखील दोन सामने खेळल्यानंतर मायदेशी परत जाणार आहे. इंग्लंड संघ वेस्ट इंडिजविरुद्ध २९ मेपासून वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे.
मुंबई संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर
प्ले ऑफ गाठण्यासाठी मुंबईला उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील. भारत-पाक तणावामुळे आयपीएस एक आठवडा स्थगित ठेवण्यात आले होते. १७ मेपासून सामने पुन्हा सुरू होत आहेत. फायनल ३ जून रोजी होईल.
मुस्तफिजूरचा मार्ग मोकळा
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. २९ वर्षांच्या या खेळाडूला बीसीबीने नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे तो १८ ते २४ मे दरम्यान खेळण्यासाठी उपलब्ध असेल. आयपीएल प्ले ऑफआधी मात्र तो राष्ट्रीय संघात परत आणार आहे. रहमानला दिल्लीने ६ कोटी रुपयांत संघात घेतले असून तो मिचेल स्टार्कचे स्थान घेईल.
पंजाब- दिल्ली सामना जयपूरला
धर्मशाला येथे ८ मे रोजी पंजाब वि दिल्ली हा आयपीएल सामना भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर १०.१ घटकांनंतर थांबविण्यात आला होता.हा सामना आता रोजी नव्याने खेळविला आईल. मैदानातील लाइट अचानक बंद होताच तांत्रिक अडचणीचे कारण देत सामना रद्द करण्यात आला. त्यावेळी पंजाबने १ बाद १२२ अशी मजल माइली होती.