Join us

सामना संपला! पण ओव्हर काही संपता संपली नाही! पाक विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची फजिती

John Hastings 18 Balls In One Over : पाकनं सामना जिंकला, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच ओव्हर काही संपली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:23 IST

Open in App

John Hastings 18 Balls In One Over : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL 2025) स्पर्धेतील १४ व्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यातील पाकच्या विजय अन् ऑस्ट्रेलियाच्या पराभवापेक्षा सर्वाधिक चर्चा रंगतीये ती  १८ चेंडूनंतरही अधूर षटक राहिलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं कहर केला, सामना संपला तरी षटक नाही संपले या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या ७४ धावांवर आटोपला. पाकिस्तानच्या ताफ्यातून अजमलने ३.५ षटकात ६ विकेट्स घेत कांगारुंचे कंबरडे मोडले. अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना ७ व्या षटकानंतर पाकिस्तानच्या सलामी जोडीनं धावफलकावर ५५ धावा लावल्या होत्या. पाकिस्तान संघाला २० धावांची आवश्यकता असताना जॉन हेस्टिंग्स (John Hastings) आठव्या षटकात गोलंदाजीला आला.

क्रिकेटच्या मैदानातील दुसरे मोठे षटक, एका षटकात कुणी टाकलेत सर्वाधिक चेंडू?

या षटकात ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने १८ चेंडू फेकले. शेवटी पाकिस्तानने सामना जिंकला, पण त्याचे षटक काही पूर्ण झाले नाही. पाच चांगले चेंडू टाकण्यासाठी त्याने १८ चेंडू फेकले. त्याने टाकलेले षटक हे क्रिकेट जगतातील आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अन् खराब षटक ठरले. १९८९-९० मध्ये  बर्ट व्हॅन्स या न्यूझीलंडच्या गोलंदाजाने २२ चेंडूच षटक टाकल्याचा रेकॉर्ड आहे.

५ चेंडूत २० धावा अन् पाकनं जिंकला सामना

पाक विरुद्धच्या लढतीत आठव्या षटकात गोलंदजीला आल्यावर जॉन हेस्टिंग्स याने पाच वाइड चेंडू टाकल्यावर एक चांगला चेंडू टाकला. ज्यावर एक धाव मिळाली. याचा अर्थ पहिल्या चेंडूवर त्याने सहा धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडूवर चौकार मारल्यावर पुन्हा त्याची लाइन लेंथ विस्कटली. एक नो बॉल आणि वाइड चेंडू टाकल्यावर तिसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव खर्च केली. पुन्हा एक वाइट चेंडू टाकल्यावर चौथा चेंडू त्याने निर्धाव टाकला. मग पाचव्या चेंडूवर एक धाव गेली.  जशी षटकाची सुरुवात केली तसेच त्याने मग पाच चेंडू वाइड टाकले. पाकिस्तानने मॅच जिंकली. पण त्याचे षटक मात्र पूर्ण झालेच नाही.   

टॅग्स :टी-20 क्रिकेटपाकिस्तानआॅस्ट्रेलिया