The Major Updates for T20 World Cup 2024 (Marathi News) : १ जून २०२४ पासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेबाबत महत्त्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यामाने वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातली लढत ९ जूनला न्यू यॉर्क येथे होणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये ९ वेगवेगळ्या शहरांमध्ये ५५ सामने होणार आहेत. आता या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारिख समोर आली आहे.
पात्र ठरलेले २० संघ...
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
गटवारी
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
स्पर्धेचा फॉरमॅट...
- २० संघ
- प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी
- चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र
- सुपर ८मध्ये ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी
- दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत
- फायनल
भारतीय संघाचे वेळापत्रक
५ जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
९ जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
१२ जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
१५ जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
महत्त्वाचे अपडेट्स
- सर्व संघांना १ मे पर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ जाहीर करावा लागणार आहे
- जाहीर केलेल्या संघात २५ मे पर्यंत बदल करता येणार आहे
- प्रत्येक संघाला १५ खेळाडूच निवडता येणार आहेत
- स्पर्धेसाठी यजमान देशांत दाखल झाल्यानंतर सघांना किमान २ सराव सामने खेळावे लागतील