Join us

थायलंडच्या क्रिकेट संघाची कमाल; ट्वेंटी-20त नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

थायलंडच्या महिला क्रिकेट संघाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 14:46 IST

Open in App

दुबई : थायलंडच्या महिला क्रिकेट संघाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. त्यांनी सलग 17 सामन्यांत विजय मिळवत वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेच्या ब गटात थायलंडने विजयी मालिका कायम राखली आहे. त्यांनी शनिवारी झालेल्या सामन्यात नेदरलँड्सला 54 धावांत गुंडाळले आणि आठ षटकांत हे लक्ष्य एकही विकेट न गमावता पार केले. तत्पूर्वी त्यांनी आयर्लंड व स्कॉटलंडवर मात केली होती.

थायलंडने या विजयासह विश्वविक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने मार्च 2014 ते ऑगस्ट 2015 या कालावधीत सलग 16 ट्वेंटी-20 सामन्यांत विजय मिळवला होता. तो विश्वविक्रम थायलंडने मोडला. सलग 10 किंवा त्यापेक्षा अधिक ट्वेंटी-20 सामने जिंकणाऱ्या संघांत इंग्लंड ( 14), झिम्बाब्वे ( 14) आणि न्यूझीलंड ( 12) या तीन संघांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने मार्च 2018पासून सलग 12 सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेचा महिला संघ सलग 14 विजयांसह थायलंडच्या विक्रमाच्या जवळपास पोहण्यासाठी प्रयत्नशील आहे. थायलंडने जुलै 2018मध्ये संयुक्त अरब अमिरातीला नमवून विजयी मालिकेचा श्रीगणेशा केला.  

टॅग्स :थायलंडआॅस्ट्रेलियाटी-20 क्रिकेटमहिला टी-२० क्रिकेट