Team India’s Schedule For 2022: भारतीय संघानं २०२१चा शेवट गोड केला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटीत भारतानं विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या वर्षाची सुरुवातही दणक्यात झाली होती. ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा त्यांच्याच घरी नमवण्याचा पराक्रम भारतीय संघानं करून दाखवला होता. पण, आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलमधील हार अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानं टीम इंडियाचे चाहते प्रचंड निराश झाले. इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत भारतानं आघाडी घेतली असती तरी मालिकेतील पाचवा सामना २०२२मध्ये खेळवला जाणार आहे.
२०२२मध्ये भारतीय संघ दोन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. कसोटीचे नेतृत्व विराट कोहलीकडे असेल, तर ट्वेंटी-२० व वन डे संघाचा भार रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. आगामी वर्षात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर स्थगित झालेल्या पाचव्या कसोटीसह वन डे व ट्वेंटी-२० मालिकेसाठी जाणार आहे.
![]()
जाणून घेऊयात भारतीय संघाचे वेळापत्रक ( Team India’s schedule for 2022 looks like )
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
३ ते ७ जानेवारी - दुसरी कसोटी, जोहान्सबर्ग
११ ते १५ जानेवारी - तिसरी कसोटी, केप टाऊन
१९ जानेवारी - पहिली वन डे, पार्ल
२१ जानेवारी - दुसरी वन डे, पार्ल
२३ जानेवारी- तिसरी वन डे, केप टाऊन
वेस्ट इंडिजचा भारत दौरा, २०२२
६ फेब्रुवारी - पहिली वन डे, अहमदाबाद
९ फेब्रुवारी - दुसरी वन डे, जयपूर
१२ फेब्रुवारी - तिसरी वन डे, कोलकाता
१५ फेब्रुवारी - पहिली ट्वेंटी-२०, कटक
१८ फेब्रुवारी - दुसरी ट्वेंटी-२०, विशाखापट्टणम
२० फेब्रुवारी - तिसरी ट्वेंटी-२०, तिरुवनंतपूरम
श्रीलंकेचा भारत दौरा, २०२२
२५ फेब्रुवारी ते १ मार्च - पहिली कसोटी, बंगलोर
५ ते ९ मार्च - दुसरी कसोटी, मोहाली
१३ मार्च - पहिली ट्वेंटी-२०, मोहाली
१५ मार्च - दुसरी ट्वेंटी-२०, धर्मशाला
१८ मार्च - तिसरी ट्वेंटी-२०, लखनौ
इंडियन प्रीमिअर लीग २०२२
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा, २०२२
९ जून - पहिली ट्वेंटी-२०, चेन्नई
१२ जून - दुसरी ट्वेंटी-२०, बंगलोर
१४ जून - तिसरी ट्वेंटी-२०, नागपूर
१७ जून - चौथी ट्वेंटी-२०, राजकोट
१९ जून - पाचवी ट्वेंटी-२०, दिल्ली
![]()
भारताचा इंग्लंड दौरा, २०२२
१ ते ५ जुलै - पाचवी कसोटी, बर्गिंगहॅम
ट्वेंटी-२० मालिका
पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज
वन डे मालिका
पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड
ऑक्टोबर-नोव्हेंबर - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, ऑस्ट्रेलिया