ट्वें-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंची दमछाक होणार हे समोर दिसत असूनही BCCI आणखी काही मालिकांचे आयोजन करण्याच्या तयारीत आहेत. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात रवाना होणार आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिकाही आयोजित करण्यात येणार आहे, पण यात दोन्ही संघांच्या बी टीम खेळतील असा अंदाज आहे.
वेस्टइंडिज दौऱ्याचे वेळापत्रक
वन डे मालिका-
२२ जुलै - पहिली वन डे - पोर्ट ऑफ स्पेन
२४ जुलै - दुसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन
२७ जुलै - तिसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)
ट्वेंटी-२० मालिका-
२९ जुलै - पहिला ट्वेंटी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन
१ ऑगस्ट - दुसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
२ ऑगस्ट - तिसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
६ ऑगस्ट - चौथा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा
७ ऑगस्ट - पाचवा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)
यानंतर झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील वन डे मालिकेची सुरूवात १८ ऑगस्टपासून होईल. २० तारखेला दुसरा तर २२ तारखेला तिसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाईल. या मालिकेत भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडू खेळणार आहेत, पण विराट कोहलीने या मालिकेत खेळावे अशी BCCI ची इच्छा आहे. त्यानंतर आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका
२० सप्टेंबर - मोहाली
२३ सप्टेंबर - नागपूर
२५ सप्टेंबर - हैदराबाद
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका
ट्वेंटी-२०
२८ सप्टेंबर - त्रिवेंद्रम
१ ऑक्टोबर - गुवाहाटी
३ ऑक्टोबर - इंदूर
वन डे
६ ऑक्टोबर - रांची
९ ऑक्टोबर- लखनौ
११ ऑक्टोबर - दिल्ली.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
१३ नोव्हेंबरला अंतिम सामना