Join us

वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली टीम इंडिया; कॅरेबियन बेटांवर अलर्ट जाहीर

भारतीय संघासोबतच अनेक पत्रकारही बार्बाडोसमध्ये अडकले आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 05:51 IST

Open in App

बार्बाडोस - भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात शनिवारी दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक पटकावला. यानंतर भारतीय संघ सोमवारी सकाळपर्यंत मायदेशी परतणे अपेक्षित होते, परंतु बार्बाडोसला चक्रिवादळाचा तडाखा बसल्याने संघ तिथेच अडकला आहे. 

कॅरेबियन बेटाच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावर ‘बेरिल’ नावाचे चक्रीवादळ घोंगावत आहे. खराब हवामान आणि सातत्याने पडणारा मुसळधार पाऊस यामुळे हवाई वाहतूक बंद ठेवली आहे. 

सोमवारी रात्रीपर्यंत पाऊस थांबला, परंतु जोरदार वारे कायम होते, तसेच हवामानही ढगाळ आहे. भारतीय संघासोबतच अनेक पत्रकारही बार्बाडोसमध्ये अडकले आहेत.  बीसीसीआयचे सचिव जय शाह हेदेखील संघासोबत बार्बाडोस येथे असून, ते संघासोबतच परतणार आहेत. 

कॅरेबियन बेटांवर अलर्टया वादळामुळे कॅरेबियन बेटांवर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तसेच जसजसे वादळ जवळ येईल, तसे वाऱ्याचा वेग तब्बल १३० मैल प्रतितास इतका होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली. 

टॅग्स :भारतट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका