Join us

वन डे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची आज निवड; 'या' २ अनुभवी खेळाडूंचा 'पत्ता कट' होणार?

संघ जाहीर करण्याचा आजचा शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 10:44 IST

Open in App

Team India Squad, ODI World Cup 2023: भारतीय संघाची 5 ऑक्टोबरपासून होणाऱ्या विश्वचषक 2023 साठी आज दुपारी 1.30 घोषणा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा वगळता, वन डे विश्वचषक संघात तेच १५ खेळाडू असतील ज्यांना आशिया कपसाठी श्रीलंकेला पाठवण्यात आले आहे. सर्व 10 संघांना 5 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खेळाडूंची यादी ICC कडे सादर करायची होती. भारत शेवटच्या दिवशी आपला संघ जाहीर करणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

अश्विन-सुंदरची आशा संपुष्टात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघासोबत असलेले निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात ३० ऑगस्टपासून कॅंडीत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन किंवा ऑफस्पिनर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला शेवटच्या क्षणी प्रवेश मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांची संघाचे स्पेशालिस्ट अष्टपैलू म्हणून निवड करण्यात आली आहे. ते विश्वचषकात खेळतील असे म्हटले जात आहे.

 

केएल-अय्यर-बुमराहची तंदुरुस्ती

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, जसप्रीत बुमराह-श्रेयस अय्यर-केएल राहुल या त्रिकुटाच्या तंदुरुस्तीच्या स्थितीबाबत त्याच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. हे तिघे नुकतेच दुखापतीतून सावरले आहेत. तिन्ही खेळाडूंचे चांगले पुनर्वसन झाले आहे. परिणामी, निवड समिती आणि संघ व्यवस्थापन आशिया चषकासाठी निवडलेल्या मुख्य संघाशी छेडछाड करण्याची शक्यता नाही.भारताचा संभाव्य संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, सुर्यकुमार यादव. बुमराह, केएल राहुल (यष्टीरक्षक)विश्वचषकात भारताचे वेळापत्रक

  • ८ ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, दुपारी 2
  • ११ ऑक्टोबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान, नवी दिल्ली, दुपारी 2
  • १४ ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद, दुपारी २
  • १९ ऑक्टोबर: भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे, दुपारी 2
  • २२ ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला, दुपारी 2
  • २९ ऑक्टोबर: भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ, दुपारी 2
  • २ नोव्हेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई, दुपारी 2
  • ५ नोव्हेंबर: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता, दुपारी २
  • १२ नोव्हेंबर: भारत विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू दुपारी 2
टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरोहित शर्माअजित आगरकरभारतीय क्रिकेट संघ
Open in App