Join us

VIDEO : शास्त्री गुरुजींसमोर विराटसेनेने केली नव्या खेळाडूंची रॅगिंग

 प्रत्येक संघाचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 13:23 IST

Open in App

मॅचेस्टर - भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण चांगले आहे.  प्रत्येक संघाचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत असते. तसेच नव्या खेळाडूचे स्वागतही हटके पद्धतीने केले जाते. जखमी बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या जागेवर काल भारतीय संघात दोन नव्या खेळाडूंचे आगमन झाले.  त्यांच्यासोबत संघातील सिनियर खेळाडूंनी मस्करी केली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिखर धवनने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. यामध्ये दिपक चहर आणि क्रृणाल पांड्या आपला परिचय देताना दिसत आहेत. समोर मुख्य कोच रवि शास्त्रीही बसलेले दिसत आहेत. त्यामुळे सध्या भारतीय संघात खेळीमेळीचे वातावरण दिसून येत आहे. 

 

ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करत टी-20 मालिकेत विजयी सुरुवात केली आहे.  इंग्लंडने निर्धारीत 20 षटकात ८ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून केएल राहुलने दमदार शतक करत वियात सिंहाचा वाटा उचलला होता. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवी शास्त्रीशिखर धवनटी-20 क्रिकेटइंग्लंड विरुद्ध भारत