Join us

त्यांना धडा शिकवण्याची वेळ आले; शिवम दुबेची पत्नी संतापली, मुस्लीम समाजाला केलं 'हे' आवाहन

Shivam Dube News : अंजुम खानने भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांच्या अटकेची मागणी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 18:04 IST

Open in App

Shivam Dube Wife Anjum Khan :भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. अलीकडेच भारत आणि श्रीलंका यांच्यात वन जे मालिका खेळवली गेली. यात भारताला ०-२ असा दारूण पराभव स्वीकारावा लागला. शिवम दुबेने पहिल्या सामन्यात संयमी खेळी केली होती पण तो आपल्या संघाला विजयी करू शकला नाही. आता दुबे त्याच्या पत्नीमुळे चर्चेत आला आहे. शिवम दुबेची पत्नी अंजुम खानने भाजप नेत्यावर टीका करताना मुस्लीम समाजाला एक आवाहन केले आहे. 

अंजुम खानने भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांच्या अटकेची मागणी केली आणि मुस्लीम समाजाला त्यांच्याविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले. नाझिया इलाही खान या भाजपच्या अल्पसंख्याक सेलच्या सदस्या आहेत. त्यांनी तिहेरी तलाक पीडित इशरत जहाँची वकील म्हणून प्रसिद्धी मिळवली आणि मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्याविरुद्ध भेदभाव करणाऱ्या धार्मिक प्रथांसाठी आवाज उठवत असल्याचा दावा केला. पण, त्यांच्या एका विधानावरून दुबेची पत्नी अंजुम खानचा राग अनावर झाला आणि तिने त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत अंजुम खानने प्रतिक्रिया दिली. तिने मुस्लीम समाजाला आवाहन करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, जर तुम्हाला राग येत नसेल तर तुमचा आत्मा मेला आहे. पण, जर तो जिवंतर असेल तर #arrestnaziaelahikhan चा वापर करून आवाज उठवा. सर्वांना माझे सांगणे आहे की, नाझिया इलाही खानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. 

नाझिया इलाही खान काय म्हणाल्या?

शिवम दुबेची पत्नी अंजुम खान ही उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील आहे. तिने मुस्लीम महाविद्यालयातून शिक्षण घेतले. दुबेशी लग्न करण्यापूर्वी तिने मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले. शिवम दुबे आणि अंजुम हे १६ जुलै २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही रितीरिवाजांनुसार लग्न केले.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्डमुस्लीमभाजपा