India tour of Ireland : घरच्या मैदानात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक जेतेपदानंतर भारतीय संघातील स्टार खेळाडू आता आपापल्या फ्रँचायझी संघाकडून IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी जोर लावणार आहेत. एका बाजूला IPL चा माहोल दिसून येत असताना बीसीसीआयने भारताच्या आयर्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ जूनमध्ये आयर्लंडचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यात १९ वर्षांनंतर भारतीय संघ बेलफास्टच्या मैदानात खेळताना दिसणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारताच्या आयर्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर
भारतीय क्रिकेट संघ जूनमध्ये आयर्लंड विरुद्ध २ सामन्यांची द्विपक्षीय टी-२० मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने अधिकृत एक्स अकाउंटवरून दिलेल्या माहितीनुसार, २६ जूनला भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार असून २८ जूनला या दौऱ्यातील दुसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. दोन्ही सामने बेलफास्टच्या मैदानात नियोजित आहेत.
टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक ठरले! कधी अन् कुठे रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर
भारत-आयर्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिका वेळापत्रक
पहिला टी २० सामना : २६ जून, बेलफास्ट
दुसरा टी २० सामना : २८ जून, बेलफास्ट
१९ वर्षांनी टीम इंडिया या मैदानात खेळणार
भारतीय संघ २००७ नंतर पहिल्यांदाच बेलफास्टयेथील मैदानात आयर्लंडविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळताना दिसेल. याआधी २०१८, २०२२ आणि २०२३ मध्ये भारतीय संघाने आयर्लंड दौरा केला. पण त्यावेळी टीम इंडियाचे सामने हे डब्लिन (मॅलाहाइड) येथे खेळवण्यात आले होते. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा हा पहिला परदेशी दौरा असेल. आयर्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ थेट इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेय त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालीलच भारतीय संघ या दौऱ्यावर जाणार की, काही नवा प्रयोग पाहायला मिळणार ते पाहण्याजोगे असेल.