Join us

WTC: शुबमन गिलवर संतापले कोच राहुल द्रविड, पहिल्याच सराव सत्रात केली मोठी चूक

Rahul Dravid Shubman Gill: शुबमन गिलला अनेक अनुभवी खेळाडूंसोबत मोठी स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 15:36 IST

Open in App

Rahul Dravid Shubman Gill, WTC Final 2023: लंडनला पोहोचल्यानंतर टीम इंडियाने 4 जून रोजी ओव्हल मैदानावर पहिला सराव केला. भारतीय संघाने सकाळी ओव्हलवर सराव केला. सराव झाला, पण त्याआधी जे काही घडलं, त्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड थोडेसे नाराज झालेले दिसले. द्रविडला ज्या गोष्टीचा राग आला ती बाब शुभमन गिलच्या संदर्भात घडली. सध्या क्रिकेटमध्ये ज्या फलंदाजाचा फॉर्म अगदी उत्तम आहे, त्याचं असं काय चुकलं असेल की खुद्द मुख्य प्रशिक्षक त्याच्यावर नाराज झाले, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल. पण गिलची ही चूक अशा प्रकारची होती की त्यावर एक संयमी, शिस्तबद्ध आणि शांत कोच नक्कीच नाराजी व्यक्त करू शकतो.

काय होती गिलची ज्यामुळे द्रविड झाला नाराज

खरं तर झालं असं की, टीम इंडियाचा पहिला सराव लंडनमध्ये झाला तेव्हा शुभमन गिल तिथे उशिरा पोहोचला. तो तेथे पोहोचण्यापूर्वीच टीम इंडियाचा सराव सुरू झाला होता. या सराव सत्रात भारतीय संघाचा एक प्लॅन होता. सामन्यात ज्या फलंदाजी क्रमाने बॅटिंग होईल, त्याच क्रमाने सराव करायचा होता. पण, गिल उशिरा आल्याने ते होऊ शकले नाही.

गिलला द्रविडकडून काय शिक्षा झाली?

शुभमन गिलच्या या वर्तणुकीवर राहुल द्रविड संतापला. त्याचा गिलचा थोडा राग आला. त्याने रोहित शर्मासह विराट कोहलीला सरावासाठी पाठवले. यानंतर गिल तेथे पोहोचल्यावर गिलला बराच काळ त्याच्या बॅटिंगची वाट पहावी लागली. राहुल द्रविड नंतरही गिलशी बोलला. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याचेही समजले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशुभमन गिलराहुल द्रविडविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App