भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship Final) न्यूझीलंडकडून ८ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला. भारताला दुसऱ्या डावात १७० धावाच करता आल्या अन् न्यूझीलंडनं केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीच्या जोरावर सहज विजय मिळवला. भारताला पराभव पत्करावा लागल्यानं विराट कोहलीचं आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा धुळीस मिळालं अन् सोशल मीडियावर टीम इंडियासाठी 'Chokers' हा ट्रेंड सुरू झाला. आतापर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये मोक्याच्या क्षणी कच खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला हा टॅग दिला गेला होता, परंतु आता तो टीम इंडियाच्या माथी लागलेला पाहायला मिळत आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!
आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!
भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship Final) न्यूझीलंडकडून ८ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 17:09 IST
आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!
ठळक मुद्देभारतीय संघानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर सहा आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाला बाद फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.