Join us

तुझी साथ हे माझं भाग्य! राहुल द्रविडसाठी रोहितची भावनिक पोस्ट; डोळ्यात येईल पाणी, वाचा सविस्तर

राहुल द्रविड यांच्यासाठी रोहित शर्माने एक लांबलचक पोस्ट लिहिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:47 IST

Open in App

कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकला. या विश्वचषकासह द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. तर रोहित शर्माने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचे मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी हिटमॅन रोहितने एक खास पोस्ट लिहिली आहे. रोहितने म्हटले की, डिअर राहुल भाई, तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना योग्यरित्या व्यक्त करण्यासाठी मी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मी योग्य लिहीन याची खात्री नाही पण प्रयत्न करत आहे. 

तसेच लहानपणापासून मी इतर कोट्यवधी लोकांप्रमाणेच तुझ्याकडे पाहिले आहे. पण तुझ्यासोबत जवळून काम करता आले यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तू या खेळातील दिग्गज व्यक्ती आहेस. परंतु, तू सर्वकाही सोडून, इतर गोष्टींचा त्याग करून आमच्यासाठी प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहिलास. ही तू आम्हाला दिलेली मोठी देणगी आहे. तुझी नम्रता आणि एवढ्या काळानंतरही या खेळावर असलेले तुझे प्रेम... मी तुझ्याकडून खूप काही शिकलो आहे आणि प्रत्येक आठवण जपेन, असेही रोहितने नमूद केले. 

रोहितने त्याची पत्नी रितीका सजदेहच्या विधानाचा दाखला देत म्हटले की, माझी पत्नी राहुल द्रविडला माझी कामाची बायको म्हणून संबोधते. आम्ही एकत्र येऊन ते (विश्वचषक) साध्य करू शकलो. राहुल भाई, तुला माझा विश्वासू, माझा प्रशिक्षक आणि माझा मित्र म्हणायला मिळणे हा एक विशेष विशेषाधिकारच म्हणावा लागेल. 

टॅग्स :रोहित शर्माराहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ