'फायनल'चा थरार! ३०० सीसीटीव्ही आणि ४५०० जवानांचा पहारा; भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज

ICC T20 WC Final: अहमदाबादमध्ये मैदानातील खेळाडूंच्या सुरक्षिततेपासून ते रस्त्यावरील ट्रॅफिकपर्यंत गुजरात पोलिसांनी चोख नियोजन केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 20:31 IST2026-03-07T20:28:41+5:302026-03-07T20:31:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 World Cup Final Ahmedabad Turns Into a Fortress for India NZ Clash 4500 Cops to Guard Modi Stadium | 'फायनल'चा थरार! ३०० सीसीटीव्ही आणि ४५०० जवानांचा पहारा; भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज

'फायनल'चा थरार! ३०० सीसीटीव्ही आणि ४५०० जवानांचा पहारा; भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज

Narendra Modi Stadium ICC T20 WC Final: संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा महाअंतिम सामना रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज झाले आहे. १ लाख ३२ हजार प्रेक्षक क्षमतेच्या या स्टेडियममध्ये होणारी गर्दी लक्षात घेता, गुजरात पोलिसांनी सुरक्षेचा आणि ट्रॅफिकची मोठी व्यवस्था केली आहे.

४५०० जवान तैनात

या महामुकाबल्यासाठी अहमदाबादपोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण सुरक्षा मोहीम राबवली जात आहे. ७ डीसीपी, १० एसपी, २५ पोलीस इन्स्पेक्टर आणि ७८ सब-इन्स्पेक्टर मैदानावर तैनात असतील. स्टेडियमच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी २००० पोलीस जवान, तर वाहतूक नियोजनासाठी १५०० ट्रॅफिक पोलीस, असे एकूण ४५०० पेक्षा जास्त कर्मचारी रात्रंदिवस ड्युटीवर असतील.

३०० हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

स्टेडियम परिसरातच एक विशेष कंट्रोल रूम उभारण्यात आला असून, तिथून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच स्टेडियमचा कानाकोपरा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणला गेला आहे. ३०० हून अधिक हाय-रिझोल्यूशन कॅमेरे स्टेडियमचे स्टँड्स, एन्ट्री-एक्झिट गेट्स, पार्किंग आणि स्टेडियमकडे येणाऱ्या रस्त्यांची लाईव्ह मॉनिटरिंग करतील. खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या ४ टीम्स आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी एनडीआरएफची तुकडीही तैनात करण्यात आली आहे.

वाहतूक नियमावली आणि 'नो-एंट्री'

प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. जनपथ टी-जंक्शन ते स्टेडियम मेन गेट आणि कृपा रेसिडेन्सी टी-जंक्शन ते मोटेरा गावापर्यंत सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना सकाळी १० ते रात्री २ वाजेपर्यंत बंदी असेल. फक्त व्हीव्हीआयपी आणि विशेष परवानगी असलेल्या वाहनांनाच स्टेडियम जवळ प्रवेश मिळेल. सर्वसामान्यांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रेक्षकांसाठी मेट्रोचा आधार

गर्दी टाळण्यासाठी अहमदाबाद मेट्रो प्रशासनाने महत्त्वाची घोषणा केली आहे. स्टेडियमचे गेट नंबर १ आणि २ हे मोटेरा मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ आहेत. सामन्याच्या दिवशी प्रेक्षकांसाठी मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत उपलब्ध असेल, जेणेकरून १ लाखाहून अधिक क्रिकेट प्रेमींना सुलभ प्रवास करता येईल.
 

Web Title : भारत-न्यूजीलैंड फाइनल: क्रिकेट रोमांच के लिए अहमदाबाद सुरक्षा के साथ तैयार!

Web Summary : नरेंद्र मोदी स्टेडियम में भारत-न्यूजीलैंड फाइनल के लिए अहमदाबाद तैयार है। कड़ी सुरक्षा में 4500 जवान और 300 सीसीटीवी कैमरे शामिल हैं। यातायात प्रतिबंध लागू हैं, और प्रशंसकों के लिए मेट्रो सेवाएं आधी रात तक चलेंगी।

Web Title : India-New Zealand Final: Ahmedabad Ready with Security for Cricket Thriller!

Web Summary : Ahmedabad is set for the India-New Zealand final at Narendra Modi Stadium. Tight security includes 4500 personnel and 300 CCTV cameras. Traffic restrictions are in place, and metro services will run until midnight for fans.