अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात आलेल्या परदेशी खेळाडूंची कोंडी झाली आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आल्यावर कॅरेबियन खेळाडूंच्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी घरी परतण्यास विलंब होत असल्यामुळे ICC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात भारतीय संघाने ज्या इंग्लंडला पराभवाचा दणका देत स्पर्धेबाहेर काढले त्यांच्यावर आयसीसी मेहरबान झाल्याचे दिसते, अशा आशयाचे वक्तव्य करत दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलर आणि क्विंटन डीकॉक यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी कोणत्या मुद्यावरुन आयसीसीवर नाराजी व्यक्त केली आहे जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयसीसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
आमच्या आधी इंग्लंडच्या संघाला चार्टर फ्लाइटची व्यवस्था कशी झाली? हे समजण्यापलिकडचे आहे, असे म्हणत क्विंटन डी कॉक आणि डेविड मिलर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर टिका केली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षमय वातावरणामुळे विमान सेवेवर परिणाम झाला आहे या परिस्थितीत खेळाडूंना सुरक्षित मायदेशी परत पाठवण्यासाठी ICC विशेष चार्टर विमानाची व्यवस्था करत आहे. पण त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून इंग्लंडला सर्वात आधी प्राधान्य दिले आहे, असे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी म्हटले आहे.
"कोच साब…किलर कॉम्बो"! ६०३ दिवसांनी इन्स्टावर परतला MS धोनी; गंभीरसंदर्भातील कमेंट व्हायरल
इंग्लंडचा संघ दुसऱ्या दिवशी लगेच मायदेशी परतला
यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा संघ गुरुवारी, ५ मार्चला मुंबईतील वानखेडेच्या मैदानात भारताविरुद्ध खेळताना दिसला होता. या सामन्यातील पराभवासह त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. त्यानंतर या संघातील खेळाडू शनिवारीच चार्टर विमानाने थेट लंडनला रवाना झाले. दुसरीकडे त्यांच्या आधी स्पर्धेतून बाद झालेल्या वेस्ट इंडिजसह दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडू अजूनही भारतातच अडकून आहेत.
वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका संघ वेटिंगवर
इंग्लंडआधी रविवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानातील भारताविरुद्धच्या पराभवासह वेस्ट इंडिजचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला होता. त्यापाठोपाठ बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेसह वेस्ट इंडिजचे खेळाडू कोलकात्यातून एकत्र चार्टर फ्लाइटने रवाना होण्याची शक्यता आहे. मात्र नेमके कधी ते अद्याप निश्चित झालेला नाही.
क्विंटन डी कॉक अन् मिलरची नाराजी
गंमतच वाटते, आम्ही कधी घरी परतणार त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. पण इंग्लंड आमच्या आधी कसे निघाले. वेस्ट इंडिजसह दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ICC नं अंधारतच ठेवल्याचे दिसते, अशा आशयाची पोस्ट शेअर करत क्विंटन डीकॉकनं आयसीसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. मिलरनं नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे की, इंग्लंडला चार्टर विमान मिळाले, आमचं काय? आम्ही कोलकाता येथे प्रतिक्षा करत बसलो आहे. याआधी वेस्ट इंडिजला दोन वेळा टी-२० चॅम्पियन करणारा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक डॅरेन सॅमी यानेही घरी परतण्यास विलंब होत असल्याची खंत व्यक्त केली होती.
इंग्लंडच्या दिग्गजाचाही ICC ला टोला
ज्या इंग्लंडला पहिली पसंती देण्यात आली त्या संघाचा माजी कर्णदार मायकलॉन याने ICC च्या परदेशी खेळाडूंच्या सुरक्षित प्रवासासंदर्भातील गोष्टीवर भाष्य केले आहे. ICC मध्ये कोणत्या देशाच वजन आहे त्यावरून निर्णय न घेता सर्व संघांना समान वागणूक मिळायला हवी, असे म्हणत त्याने आयसीसीला टोला लगावला आहे.