Shubman Gill, T20World Cup 2026: भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आगामी ICC टी२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी भारतीय टी२० संघाची घोषणा केली. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत. या बड्या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेल उपकर्णधार असणार आहे. संजू सॅमसन आणि इशान किशन या दोन सलामीवीरांना संघात स्थान मिळाले आहे. फलंदाजीत सतत अपयशी ठरणाऱ्या शुबमन गिलला संघाबाहेर करण्यात आले आहे. त्याला संघाबाहेर काढण्याची स्क्रिप्ट लखनौच्या सामन्यावेळीच लिहिली गेली आहे.
२६ वर्षीय शुबमन गिलला भारताचा भविष्यातील सर्व स्वरूपातील स्टार मानले जात होते. अलीकडेच त्याला संघाचा नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण खराब फॉर्म आणि पर्यायांच्या उपलब्धतेमुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने एक कठोर आणि आश्चर्यकारक निर्णय घेतला. सिलेक्टर्सने शुबमन गिलला संघातून वगळले. संजू सॅमसन पुन्हा एकदा डावाची सुरुवात करेल, तर इशान किशन हा बॅकअप पर्याय असेल. पण गिलला संघातून वगळण्याचा निर्णय केव्हा घेण्यात आला, ते समजून घेऊया.
BCCI ने 'हे' पाऊल का उचलले?
पीटीआयच्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापन आधीच गिलच्या जागी इतर पर्यायांवर विचार करत होते. पायाच्या दुखापतीमुळे गिलला लखनौमध्ये झालेल्या चौथ्या टी२० सामन्यातून वगळण्यात आले. त्यानंतर दुखापत गंभीर नसली तरी, त्याला अहमदाबादमध्ये शेवटचा टी२० सामन्यातून वगळण्यात आले होते. त्यामुळे हा निर्णय लखनौच्या सामन्यात आधीच घेण्यात आला होता.
पीटीआयच्या वृत्तानुसार, जर बीसीसीआयच्या सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाला तर, संघ व्यवस्थापनाने उपकर्णधाराला वगळण्याचा निर्णय आधीच घेतला होता. गिल स्वतः अहमदाबादमध्ये खेळू इच्छित होता आणि दुखापत गंभीर नव्हती. सुरुवातीला, वैद्यकीय पथकाला हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचा संशय होता, परंतु नंतर स्कॅन केल्यावर ते फक्त एक जखम असल्याचे दिसून आले आणि गिल पेनकिलर घेऊन खेळू शकला असता. पण त्याला खेळवण्यात आले नाही. त्यामुळेच व्यवस्थापनाने गिलऐवजी संजू सॅमसनची निवड केली.
खराब फॉर्ममुळे दबाव वाढला
टी२० सामन्यांमध्ये वरच्या क्रमांकावर धावा काढण्यात गिलच्या अपयशाची सतत तपासणी केली जात होती. सप्टेंबरमध्ये आशिया कप दरम्यान टी२० संघात परतल्यापासून, गिलने १५ सामन्यांमध्ये फक्त २९१ धावा केल्या. या काळात त्याची सरासरी फक्त २४.२५ होती आणि त्याचा स्ट्राइक रेट १३७.२६ होता. गिलने एकही अर्धशतकदेखील केले नव्हते. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत होती.
Web Summary : Shubman Gill was dropped from the T20 World Cup squad due to poor form. Selectors favored Samson and Kishan. The decision was made after Gill was sidelined in Lucknow due to injury, despite his desire to play.
Web Summary : खराब फॉर्म के कारण शुभमन गिल को टी20 विश्व कप टीम से बाहर कर दिया गया। चयनकर्ताओं ने सैमसन और किशन को तरजीह दी। चोट के कारण लखनऊ में गिल को बाहर किए जाने के बाद यह निर्णय लिया गया, हालांकि वह खेलना चाहते थे।