Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर

भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणार आहे आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:49 IST

Open in App

T20 World Cup 2026, IND vs PAK Match Schedule : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आगामी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. मंगळवारी, २५ नोव्हेंबरला या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याआधी भारत-पाक यांच्यातील लढतीसंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक दोन्ही संघ एकाच गटात असून १५ फेब्रुवारीला श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडिमवर हायहोल्टेज सामना नियोजित असल्याचे समजते. आशिया कप २०२५ स्पर्धेनंतर पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांना भिडतील.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारतीय संघ USA विरुद्धच्या लढतीने करेल वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात?

ESPNcricinfo च्या वृत्तानुसार,  भारत, पाकिस्तान, यूएसए, नेदरलँड्स आणि नामिबिया हे संघ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एका गटात आहेत. भारतीय संघ युएसए विरुद्धच्या लढतीनं आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करताना दिसेल. हा सामना मुंबई ७ फेब्रुवारीला खेळवण्यात येईल. त्यानंतर १२ फेब्रुवारीला भारतीय संघ नामिबिया विरुद्ध दिल्लीच्या मैदानात या स्पर्धेतील दुसरा सामना खेळेल. १५ फेब्रुवारीला भारतीय संघ कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानला भिडेल. त्यानंतर १८ फेब्रुवारीला अहमदाबादच्या मैदानात भारतीय संघ साखळी फेरीतील सामना नेदरलँड्स विरुद्ध  खेळणार आहे, असा उल्लेख या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

IND vs SA ODI Series : रोहित-विराट मिळून रचणार नवा इतिहास! सचिन-द्रविडचा महारेकॉर्ड पडणार मागे

८ मार्चला फायनल

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा  ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणार असून भारत आणि श्रीलंकेच्या मैदानात या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत.  २०२४ च्या हंगामातील स्पर्धेप्रमाणेच आगामी हंगामातील स्पर्धेत चार गटात प्रत्येकी ५ संघाचा समावेश असेल. प्रत्येक गटातून २ संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. या गटातून आघाडीचे दोन संघ सेमीफायनल खेळत फायनलचा प्रवास निश्चित करतील.

 टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील संघ

यजमान भारत आणि श्रीलंका यांच्याशिवाय या स्पर्धत अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका (USA), वेस्टइंडीज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि युएई (UAE) या संघाचा समावेश आहे.

 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ