२०२६ च्या टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या दारूण पराभवानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग अत्यंत खडतर झाला आहे. या पराभवामुळे केभारताचा नेट रन रेट उणे ३.८०० (-३.८००) पर्यंत खाली घसरला आहे. आता 'सूर्या ब्रिगेड'ला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वतःच्या कामगिरीसोबतच इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. दरम्यान, स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे अनेक बड्या खेळाडूंवर टीकेची झोड उठत असून, टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडल्यास त्यांचे आंतरराष्ट्रीय करिअर धोक्यात येऊ शकते.
भारताला आता सुपर ८ मधील उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आज होणाऱ्या झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे भारतासाठी आवश्यक आहे. मात्र, केवळ विजय पुरेसा नाही, भारताला दक्षिण आफ्रिकेच्या मदतीचीही गरज आहे. जर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केले, तरच भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत राहतील. याउलट, वेस्ट इंडिजचा विजय भारताला स्पर्धेबाहेर काढू शकतो.
'या' ४ स्टार खेळाडूंचे करिअर धोक्यात!
१) अभिषेक शर्मा
टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक शर्माने या विश्वचषकात सर्वांना निराश केले. चार सामन्यांत त्याने केवळ १५ धावा केल्या आहेत, ज्यात तीन वेळा तो शून्यावर बाद झाला आहे. १ जानेवारी २०२५ पासून ३० सामन्यांत १०५६ धावा करणाऱ्या अभिषेकचा फॉर्म अचानक हरवल्याने संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. त्याच्या जागी यशस्वी जयस्वाल किंवा १४ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांचे पर्याय समोर येत आहेत.
२) तिलक वर्मा
महत्त्वाच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या तिलक वर्माने पाच डावांत केवळ १०७ धावा केल्या आहेत. २१.४० ची सरासरी आणि ११८.८८ चा स्ट्राईक रेट या क्रमांकासाठी पोषक नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. खुद्द सुनील गावस्कर यांनीही त्याच्या शॉट सिलेक्शनवर ताशेरे ओढले आहेत. त्याच्या जागी श्रेयस अय्यरचा विचार होऊ शकतो.
३) रिंकू सिंग
'फिनिशर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंगला या विश्वचषकात फारशी चमक दाखवता आलेली नाही. पाच सामन्यांत त्याने केवळ २४ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो शून्यावर बाद झाला. काहींच्या मते त्याला पुरेशी फलंदाजी मिळालेली नाही, तरीही संघात जागा टिकवण्यासाठी त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
४) सूर्यकुमार यादव
कर्णधार सूर्याने पाच डावांत १८० धावा केल्या असल्या तरी, त्याच्या नॅच्युरल १६२.७७ च्या स्ट्राईक रेटच्या तुलनेत विश्वचषकातील १२७.६५ चा स्ट्राईक रेट खूपच कमी आहे. ३५ वर्षीय सूर्यासाठी हा विश्वचषक निर्णायक ठरू शकतो. जर भारत या स्पर्धेतून लवकर बाहेर पडला, तर त्याच्या कारकिर्दीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात.
Web Summary : India's T20 World Cup hopes dwindle after a loss to South Africa. Abhishek Sharma, Tilak Varma, Rinku Singh, and even Suryakumar Yadav face career uncertainty due to poor performance. Team needs wins and South Africa's help to reach the semi-finals.
Web Summary : दक्षिण अफ्रीका से हार के बाद भारत की टी20 विश्व कप की उम्मीदें कम हो रही हैं। अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह और सूर्यकुमार यादव खराब प्रदर्शन के कारण करियर की अनिश्चितता का सामना कर रहे हैं। सेमीफाइनल में पहुंचने के लिए टीम को जीत और दक्षिण अफ्रीका की मदद की जरूरत है।