IND vs PAK T20 World Cup Match Ticket Bookmyshow Website Crash : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवण्यात येणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. आयसीसीने या स्पर्धेतील सामन्यांच्या तिकीट विक्रीलाही सुरुवात केली आहे. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान भारतीय संघ 'अ' गटात नामीबिया, नेदरलँड्स, अमेरिका (USA) आणि पाकिस्तानविरुद्ध खेळताना दिसणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिकीट विक्रीला सुरुवात झाली, पण...
यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही संघातील लढत नेहमीच क्रिकेट चाहत्यांसाठी उत्सुकतेची असते. १५ फेब्रुवारीला कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघात सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी तिकीट विक्रीला सुरुवात होताच वेब स्टाइट खेळवला जाणार आहे.१४ जानेवारीला भारत-पाक यांच्यातील तिकीट विक्रीला सुरुवात झाली. लाखो चाहत्यांनी एकाच वेळी लॉगिन केल्यामुळे फक्त काही मिनिटांतच संपूर्ण वेबसाइट ठप्प झाली.
टी-२० नंतर आता वनडेतूनही निवृत्तीची वेळ? टीम इंडियासाठी खलनायक ठरतोय ‘हा’ स्टार क्रिकेटर
वेबसाइटच क्रॅश, आता...
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांची तिकीट विक्री ही BookMyShow या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भारत–पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री सुरू होताच, अचानक लाखो चाहत्यांनी तिकीट बुक करण्यासाठी लॉगिन केल्यामुळे प्लॅटफॉर्मचा सर्व्हर ओव्हरलोड झाला आणि त्यामुळे संपूर्ण वेबसाइट क्रॅश झाली. या संदर्भात BookMyShow शी संबंधित एका सूत्राने वृत्तसंस्था PTI ला माहिती देताना सांगितले की, एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर लॉगिन आणि व्यवहार (Transaction Requests) आल्यामुळे सिस्टमवर प्रचंड ताण आला आणि त्यामुळे वेबसाइट बंद पडली. BookMyShow कडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर अधिकृत पोस्ट करत स्पष्टीकरणही देण्यात आले. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सुरू होणार तिकीट विक्री सुरु केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.