PNG vs UGA : ऐतिहासिक! युगांडाचा वर्ल्ड कपमध्ये पहिलाच विजय; लक्ष्य छोटे पण संघर्षही मोठा

PNG vs UGA Match : युगांडाने पापुआ न्यू गिनीचा पराभव करून विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 08:20 IST2024-06-06T08:20:24+5:302024-06-06T08:20:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 World Cup 2024 PNG vs UGA HISTORY FOR UGANDA IN THE T20 WORLD CUP THEIR FIRST EVER WIN They defeat PNG by 4 wickets in a thriller | PNG vs UGA : ऐतिहासिक! युगांडाचा वर्ल्ड कपमध्ये पहिलाच विजय; लक्ष्य छोटे पण संघर्षही मोठा

PNG vs UGA : ऐतिहासिक! युगांडाचा वर्ल्ड कपमध्ये पहिलाच विजय; लक्ष्य छोटे पण संघर्षही मोठा

T20 World Cup 2024 PNG vs UGA : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील नववा सामना युगांडा आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळवला गेला. कमी धावसंख्या असलेला हा सामना प्रेक्षणीय ठरला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीचा संघ अवघ्या ७७ धावांत गारद झाला. युगांडा सहज विजय मिळवेल असे वाटत असताना त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. छोट्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना १८.१ षटके खेळावी लागली. अखेर युगांडाच्या फलंदाजांनी सावध खेळी करत विजय साकारला. सोप्या आव्हानाचा पाठलाग करत असताना युगांडाचा निम्मा संघ अवघ्या २६ धावांत तंबूत परतला होता. मग रियाजत अली शाहने मोर्चा (३३)  सांभाळला आणि सावध खेळी केली. 

अखेर युगांडाने १८.१ षटकांत ७ बाद ७८ धावा करून ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच विजय मिळवला. आव्हान छोटे होते पण रंगतदार झालेल्या या सामन्यात अखेर युगांडाला यश मिळाले. त्यांनी पापुआ न्यू गिनी संघाचा ३ गडी आणि १० चेंडू राखून पराभव केला. 

मजेशीर गोष्ट! युगांडा रेल्वे बांधण्यासाठी 'भारतीय' कामगार गेले अन् ईस्ट आफ्रिकेत क्रिकेट पोहोचले

७८ धावांच्या लहान आव्हानाचा बचाव करताना पापुआ न्यू गिनीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. युगांडा सामना सहज जिंकेल असे वाटत असताना त्यांनी संघर्ष करण्यास भाग पाडले. पापुआ न्यू गिनीकडून एलेई नाओ, नोर्मन वनुआ यांनी २-२ बळी घेतले, तर चॅड सोपर आणि कर्णधार असद वाला यांनी १-१ बळी घेऊन कडवी झुंज दिली.

युगांडाच्या गोलंदाजांची कमाल

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही. १९.१ षटकांत संघ अवघ्या ७७ धावांवर गारद झाला. लेगा सिका (१२), हिरी हिरी (१५) आणि किप्लिन डोरीगा (१२) हे तीन फलंदाज वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. युगांडाच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. अल्पेश रमजनी, कॉस्मस कियवुटा, जुमा मियागी, फ्रँक एनएसबुगा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, कर्णधार ब्रायन मसाबाला एक बळी घेण्यात यश आले. युगांडाला विजयासाठी केवळ ७८ धावांची गरज होती पण त्यांना इथपर्यंत पोहोचताना खूप संघर्ष करावा लागला. 

Web Title: T20 World Cup 2024 PNG vs UGA HISTORY FOR UGANDA IN THE T20 WORLD CUP THEIR FIRST EVER WIN They defeat PNG by 4 wickets in a thriller