'या' ३ भारतीयांच्या धडाक्याने युगांडाला मिळवून दिलं T20 World Cup चं तिकीट

या तिघांपैकी चक्क एक खेळाडू मुंबईचा आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 12:30 PM2023-12-07T12:30:51+5:302023-12-07T12:41:18+5:30

whatsapp join usJoin us
T20 world cup 2024 indian origin players of Uganda team alpesh ramjani dinesh nakrani ronak patel t20 wc | 'या' ३ भारतीयांच्या धडाक्याने युगांडाला मिळवून दिलं T20 World Cup चं तिकीट

'या' ३ भारतीयांच्या धडाक्याने युगांडाला मिळवून दिलं T20 World Cup चं तिकीट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Origin players in Uganda Cricket Team, T20 World Cup 2024 : युगांडाचा संघ 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे. युगांडा प्रथमच T20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. नामिबियात खेळल्या गेलेल्या आफ्रिका रिजनच्या पात्रता फेरीत युगांडाने दुसरे स्थान मिळवून ही ऐतिहासिक कामगिरी केली. या प्रवासात युगांडाने आयसीसीचा पूर्ण सदस्य संघ असलेल्या झिम्बाब्वेचाही ५ विकेट्सने पराभव केला. स्पर्धेत ब्रायन मसाबाने युगांडाचे नेतृत्व केले. मात्र, युगांडाला टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरविण्यात भारतीय वंशाच्या तीन खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते खेळाडू म्हणजे रोनक पटेल, अल्पेश रामजानी आणि दिनेश नाक्राणी. चला जाणून घेऊया या तीन खेळाडूंबद्दल...

रोनक पटेल: 35 वर्षीय रोनक पटेलचा जन्म गुजरातमध्ये झाला. त्याचे बालपण इथेच गेले. 2017 मध्ये, रोनक मित्राच्या सांगण्यावरून क्रिकेट खेळण्यासाठी युगांडाला गेला. रोनकने स्थानिक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर युगांडाच्या राष्ट्रीय संघात त्याला स्थान मिळाले. डावखुऱ्या रोनकच्या नावावर 38 टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 779 धावा आहेत. आफ्रिका क्षेत्र T20 विश्वचषक पात्रता स्पर्धेत रोनकने 25.40 च्या सरासरीने 127 धावा केल्या.

अल्पेश रामजानी: २९ वर्षीय अल्पेश रामजानीचा जन्म मुंबईत झाला. क्रिकेट कारकिर्दीसाठी तो युगांडाला गेला. डावखुरा अष्टपैलू अल्पेशने 30 टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29.43 च्या सरासरीने 471 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने 9.09 च्या सरासरीने 55 विकेट्स घेतल्या आहेत. अल्पेशने आफ्रिका क्षेत्र T20 विश्वचषक पात्रता स्पर्धेत 12 विकेट घेतल्या आणि सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर राहिला.

दिनेश नाक्राणी: दिनेश हादेखील गुजरातमधील कच्छमध्ये जन्मलेला आहे. सात वर्षांपूर्वी तो युगांडात गेला. डावखुरा अष्टपैलू दिनेशने 2014 मध्ये सौराष्ट्रकडून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याआधी त्याने १९ वर्षांखालील स्तरावरही गुजरातचे प्रतिनिधित्व केले होते. चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जाडेजासारखे स्टार क्रिकेटर देखील सौराष्ट्र संघाकडून खेळतात. 32 वर्षीय दिनेशने युगांडासाठी आतापर्यंत 49 टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि 30.83 च्या सरासरीने 740 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने मध्यमगती गोलंदाजी करताना 63 बळी घेतले. दिनेशने आफ्रिका विभागीय T20 विश्वचषक पात्रता फेरीत 9 विकेट घेतल्या आहेत.

Web Title: T20 world cup 2024 indian origin players of Uganda team alpesh ramjani dinesh nakrani ronak patel t20 wc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.