नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकाचा थरार 16 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. पहिल्या फेरीच्या अ गटातून श्रीलंका आणि नेदरलँड्स आणि ब गटातून झिम्बाब्वे आणि आयर्लंड सुपर 12 साठी पात्र ठरले. सुपर- 12 चा थरार 22 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून त्याचे सामने 6 नोव्हेंबरपर्यंत खेळवले जाणार आहेत. यानंतर 9 आणि 10 नोव्हेंबरला उपांत्य फेरी आणि 13 नोव्हेंबरला विश्वचषकाचा अंतिम सामना होईल. सध्या सर्वच संघानी 3-3 सामने खेळले आहेत, त्यामुळे उपांत्य फेरीचे चित्र हळू-हळू स्पष्ट होत आहे.
दरम्यान, टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल भाष्य करायचे झाले तर, मागील वर्षी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 303 धावा केल्या होत्या. तर 2016 च्या विश्वचषकात बांगलादेशच्या तमीम इक्बालने 295 धावा केल्या होत्या. 2014 मध्ये भारतीय संघाचा विराट कोहली (319), 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन (249), 2010 मध्ये श्रीलंकेचा महेला जयवर्धने (302), 2009 मध्ये श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान (317) आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने (265) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
'सूर्या'सह कोहलीची 'विराट' खेळी
यंदाच्या विश्वचषकात आताच्या घडीला आयर्लंडच्या लॉर्कन टकरने सर्वाधिक 191 धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत भारतीय संघाचे दोन खेळाडू टॉप-10 मध्ये आहेत. यामध्ये विराट कोहली (156) आणि सूर्यकुमार यादव (134) यांचा समावेश आहे. खरं तर किंग कोहली या यादीत चौथ्या स्थानावर आहे तर सूर्यकुमार यादव सातव्या स्थानावर स्थित आहे. या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या आयर्लंडच्या लॉर्कन टकरने 6 सामन्यांमध्ये 191 धावा केल्या आहेत, कारण आयर्लंडचा संघ राऊंड फेरी खेळून विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. तर भारतीय संघाने आतापर्यंत केवळ 3 सामने खेळले आहेत.
| फलंदाज | सामने | धावा | स्ट्राईक रेट | अर्धशतक/शतक | सर्वोत्तम धावसंख्या |
| लॉर्कन टकर (आयर्लंड) | 6 | 191 | 128.18 | 1/0 | 71* |
| कुशल मेंडिस (श्रीलंका) | 6 | 180 | 156.52 | 2/0 | 79 |
| मॅक्स ओ'डॉड (नेदरलॅंड्स) | 6 | 161 | 117.51 | 1/0 | 71* |
| विराट कोहली (भारत) | 3 | 156 | 144.44 | 2/0 | 82* |
| सिकंदर रझा (झिम्बाब्वे) | 6 | 145 | 145.00 | 1/0 | 82 |
| पथुम निसंका (श्रीलंका) | 5 | 137 | 97.16 | 1/0 | 74 |
| सूर्यकुमार यादव (भारत) | 3 | 134 | 178.66 | 2/0 | 68 |
| पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) | 6 | 133 | 133.00 | 1/0 | 66* |
| कॉलिन एकरमॅन (नेदरलॅंड्स) | 6 | 123 | 104.23 | 1/0 | 62 |
| अँड्र्यू बालबर्नी (आयर्लंड) | 6 | 123 | 125.51 | 1/0 | 62 |
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"