Syed Mushtaq Ali Trophy 2025 Knockouts Matches Shifted From Indore To Pune : देशांतर्गत टी-२० क्रिकेटमधील प्रतिष्ठित सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील बाद फेरीतील सर्व लढती इंदूरच्या मैदानात होणार होत्या. पण आता या लढती पुण्यातील दोन मैदानात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (MPCA) दोन आठवड्यांपूर्वीच बीसीसीआयला कळवले होते की, संघांसाठी हॉटेल रूम उपलब्ध नसल्यामुळे स्पर्धा आयोजित करणे शक्य होणार नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुण्यातील दोन मैदानात रंगणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील बाद फेरीतील लढतींचा थरार
स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० च्या शेवटच्या टप्प्यातील थरारक लढती आता पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमसह पुण्याच्या बाहेरील अंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अकादमी ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सर्व लढती पुण्यातील मैदानात खेळवण्यात येण्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे.
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
डॉक्टरांची जागतिक परिषदेमुळे क्रिकेटर्ससाठी हॉटेल्समध्ये रुम मिळणं झालं 'मुश्किल'
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (MPCA) म्हणाले की, “त्या काळात इंदूरमध्ये डॉक्टरांची जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १८ डिसेंबरदरम्यान इंदूर शहरात हॉटेल रूमची कमतरता आहे, त्यामुळे आम्ही बीसीसीआयला स्पर्धा आयोजित करणे शक्य नसल्याचे कळवले.”
खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी पोहचवण्यासाठी BCCI ला करावी लागणार कसरत, कारण...
या स्पर्धेत अनेक स्टार भारतीय क्रिकेटर सहभागी होणार आहेत. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील मुंबईकडून SMAT नॉकआऊटसाठी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीसीसीआयच्या ऑपरेशन्स टीमने पुण्यातील हॉटेल्स आधीच निश्चित केली आहेत. पण इंडिगो फ्लाइट संकटामुळे संघांच्या प्रवासावर परिणाम होऊ शकतो, कारण बहुतेक संघ प्रवासासाठी याच विमान कंपनीचा वापर करतात. त्यामुळे खेळाडूंना कोणत्याही अडचणीशिवाय स्पर्धेच्या बदलल्या ठिकाणी पोहचवण्यासाठी बीसीसीआयला कसरत करावी लागणार आहे.