SMAT 2025 : 'माय नेम इज खान'; गिलच्या पठ्ठ्याची रजतच्या कॅप्टन्सीत कमाल! ९ धावांत ६ विकेट्स अन्...

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम स्पेलचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:20 IST2025-12-08T12:16:53+5:302025-12-08T12:20:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Syed Mushtaq Ali Trophy 2025 Arshad Khan Has Set A New Record For The Best Bowling Figures With 6 Wickets Match Against Chandigarh | SMAT 2025 : 'माय नेम इज खान'; गिलच्या पठ्ठ्याची रजतच्या कॅप्टन्सीत कमाल! ९ धावांत ६ विकेट्स अन्...

SMAT 2025 : 'माय नेम इज खान'; गिलच्या पठ्ठ्याची रजतच्या कॅप्टन्सीत कमाल! ९ धावांत ६ विकेट्स अन्...

Arshad Khan Has Set A New Record In Syed Mushtaq Ali Trophy 2025 : देशांतर्गत टी-२० क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत IPL स्टार आणि शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सच्या ताफ्यातील अष्टपैलू खेळाडूनं नवा इतिहास रचला आहे.  मध्य प्रदेश विरुद्ध चंडीगड यांच्यात ग्रुप-बीमधील सामना पश्चिम बंगाल येथील कोलकाताच्या जादवपुर यूनिवर्सिटी ग्राउंडवर खेळवण्यात आला. या सामन्यात मध्य प्रदेशचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अर्शद खान याने सर्वोत्तम गोलंदाजी करत ४ षटकांच्या कोट्यात ६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. या कामगिरीसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम स्पेलचा रेकॉर्ड

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील कमालीचा स्पेल टाकताना अर्शद खान याने ४ षटकात ९ धावा खर्च करत ६ विकेट्सचा डाव साधला. या स्पर्धेतील आतापर्यंतच्या इतिहासातील कोणत्याही गोलंदाजाने केलेली सर्वोच्च कामगिरी ठरली. अर्शद खान याने अरजान हानलनावा आणि टी. रवी तेजा यांचा विक्रम मोडीत काढला. या दोघांनी २०२३ च्या हंगामातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत १३ धावा खर् करून ६ विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत डीएस पूनिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १४ धावा खर्च करत ६ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय बडोदा संघाकडून स्वप्निल सिंह याने १९ धावांत ६ विकेट्स घेतल्याची नोंद आहे.

'या' स्टार क्रिकेटपटूचा टेस्ट आणि टी-२० मधून निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय, चाहते झाले खूश!

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेशचा दिमाखदार विजय

अर्शद खान याने केलेल्या कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर मध्य प्रदेशच्या संघाने चंदिगड संघाला १३४ धावांवर रोखले. या धावांचा पाठलाग करताना रजत पाटीदारच्या मध्य प्रदेश संघाने ७ विकेट्स राखून सामना खिशात घातला. या विजयासह मध्य प्रदेशच्या संघाने नॉकआउटच्या लढतीच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. जम्मू काश्मीरसोबतच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामना जिंकून मध्य प्रदेश संघ स्पर्धेतील आपली घौडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल.
 

Web Title : SMAT 2025: रजत पाटीदार की कप्तानी में अर्शद खान का रिकॉर्ड तोड़ प्रदर्शन!

Web Summary : अर्शद खान ने 9 रन देकर 6 विकेट लेकर सैयद मुश्ताक अली ट्रॉफी में नया रिकॉर्ड बनाया। रजत पाटीदार की कप्तानी में मध्य प्रदेश ने चंडीगढ़ को हराया। खान ने पिछले रिकॉर्ड धारकों को पछाड़कर अपनी टीम को नॉकआउट चरण की ओर अग्रसर किया।

Web Title : SMAT 2025: Arshad Khan's Record-Breaking Spell Under Patidar's Captaincy!

Web Summary : Arshad Khan's 6-wicket haul for 9 runs sets a new Syed Mushtaq Ali Trophy record. Under R. Patidar's captaincy, Madhya Pradesh defeated Chandigarh. Khan surpassed previous record holders, propelling his team towards the knockout stage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.